तब्बल 3 हजार लावणी कलावंतांवर उपासमारीची वेळ, मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत

तब्बल 3 हजार लावणी कलावंतांवर उपासमारीची वेळ, मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत

तमाशाला वर्षाला अनुदान मिळतं पण लावणी शो करणाऱ्यांना याचा फायदा मिळत नाही.

  • Share this:

पुणे, 28 मार्च : पुणे म्हणजे लोककलेचं माहेरघर आहे. तब्बल 2000 ते 3000 लावणी कलाकार पुण्यात आहेत. मार्च ते मे या 3 महिन्यात लावणी कलावंतांची वर्षभराची कमाई होत असते. पण करोनामुळे सगळ्या यात्रा-जत्रा कॅन्सल झाल्यामुळे खूप नुकसान झालं आहे. तरी सरकारनं याच्या विचार करावा आणि त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी समोर येत आहे. तमाशाला वर्षाला अनुदान मिळतं पण लावणी शो करणाऱ्यांना याचा फायदा मिळत नाही.

कोरोना साथीचा तडाखा हा राज्यातील लावणी कलावंतांनाही बसला आहे. कोरोनाच्या साथीमुळे या सर्व लावणी कलावंतांचे मुंबई, पुणे, नगर, सोलापूर, कोल्हापूर, साताऱ्यात होणारे नियोजीत शोज रद्द झाले. त्यामुळे या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या तीन हजार कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. म्हणूनच शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी माया कुटेगावकर, चैञाली राजे, अर्चना जोगळेकर या आघाडीच्या लावणी कलावंतांनी मुख्यमंञ्यांकडे केली आहे.

दरम्यान, कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) सर्वाधिक धोका हा वयस्कर व्यक्तींना असल्याचं सांगितलं जातं. आतापर्यंत जितकं रुग्ण आढळलेत, त्यातील बहुतेक रुग्ण वयोवृद्ध आहेत. मात्र महाराष्ट्रात (Maharashtra) हे चित्र वेगळं आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक तरुणांना (young people) कोरोनाव्हायरसने विळखा घातला आहे. महाराष्ट्रात कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या 159 वर पोहोचली आहे. या रुग्णांमध्ये सर्वात जास्त तरुण आहेत.

राज्य सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 154 रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण तरुण आणि प्रौढ आहेत. तर वयस्कर व्यक्तींचं प्रमाण कमी आहे.

या आकडेवारीनुसार,

60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले 20 रुग्ण आहेत

तर 21 ते 60 वयोगटातील एकूण 115 रुग्ण आहेत.

31 ते 40 वयोगटात सर्वाधिक 38 रुग्ण आहेत.

राज्याची ही आकडेवारी पाहता आता चिंता अधिकच वाढली आहे.

देशभरात कोरोना व्हायरसचा धोका भारतात वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत एकूण 830 हून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर देशभरात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 तरुणांचा समावेश आहे. मध्य प्रदेशात 35 वर्षांच्या आणि बिहारमध्ये 38 वर्षांच्या तरुणाचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर 67 रुग्ण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं दिली आहे.

महाराष्ट्रात एकूण रुग्णांची संख्या 159 वर पोहोचली आहे. राज्यात मुंबईत 3 वर्षांची मुलगी आणि नवी मुंबईत दीड वर्षांच्या बाळाला कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. मुंबईत आता कोरोनाग्रस्तांची संख्या 91 झाली आहे. तर आतापर्यंत मुंबईत 05 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत संशयित रुग्णांसह 209 कोरोनाग्रस्त दाखल आहेत.

First published: March 28, 2020, 2:30 PM IST

ताज्या बातम्या