कोरोनाविरुद्ध लढताना शिक्षकाने जीव गमावला, मृत्यूनंतर मदतीचा हात पुढे करण्यासाठी प्रशासनाला अद्याप जाग नाही!

कोरोनाविरुद्ध लढताना शिक्षकाने जीव गमावला, मृत्यूनंतर मदतीचा हात पुढे करण्यासाठी प्रशासनाला अद्याप जाग नाही!

कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी किंवा मदतीचा हात पुढे करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाला अद्याप जाग आली नाही.

  • Share this:

पुणे, 2 ऑक्टोबर : खेड तालुक्यातील तिन्हेवाडी गावच्या त्रिमूर्ती विद्यालयाचे आदर्श शिक्षक संभाजी शांताराम सांडभोर (वय 44) हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने व पंचायत समिती खेड यांनी दिलेल्या गाईडलाईननुसार सर्व्हे टीममध्ये सलग सहा महिने आपले कर्तव्य बजावत होते. याच कालखंडात दिनांक 12 सप्टेंबर 2020 रोजी त्यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी सुरुवातीला खेड येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेतले. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याने त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये कोविडवरील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

उपचार घेऊन त्यांना घरी देखील सोडण्यात आले होते. मात्र दोन दिवसांनी श्वासोच्छ्वासाचा तीव्र त्रास सुरू झाल्याने त्यांना राजगुरूनगर व भोसरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोविडमुळे इतर अवयवांवर गंभीर दुष्परिणाम झाल्याने व तिथे प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पुणे येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांना पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

आज शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचे दुःखद निधन झाले. मृत्यूनंतर त्यांची कोविड चाचणी केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचं जहांगीर रुग्णालय प्रशासनाने सांगितलं.

कोविडमुळे इतर अवयवांवर गंभीर दुष्परिणाम होत असून कोविडवर मात केलेल्या रुग्णांनी अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी सांगितलं आहे. खेड तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात संभाजी सांडभोर सर यांनी केलेल्या कार्यामुळे ते विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये प्रिय होते. त्यांच्या निधनाने खेड तालुक्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पाठीमागे आई, पत्नी, एक मुलगा-मुलगी (वय 10 व 5 वर्षे) व त्रिमूर्ती विद्यालयाचे विश्वस्त श्री.सुनील सांडभोर(बंधू) असा परिवार आहे.

राज्यातील हजारो शिक्षक गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी जिल्हा अधिकारी व वरिष्ठांच्या आदेशानुसार विविध पातळीवर सर्वेक्षणाच्या कामात सहभागी झाले आहेत. कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कोविडमुळे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाखाचे विमा संरक्षण केंद्र व राज्य शासनाच्या वतीने देण्यात येते.

खेड तालुक्यात आज मृत्युमुखी पडलेले शिक्षक संभाजी शांताराम सांडभोर यांच्या पाठीमागे वृद्ध आई, पत्नी व 10 व 5 वर्षाची मुलं असून यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी किंवा मदतीचा हात पुढे करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाला अद्याप जाग न आल्याने कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसंच सांडभोर कुटुंबियांना विमा संरक्षण व योग्य मदत तात्काळ देण्याची मागणी केली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 2, 2020, 11:20 PM IST

ताज्या बातम्या