खास पुणेरी! लोकांना रोखण्यासाठी मुलाची युक्ती, ‘गाढवांनो घराबाहेर पडू नका’

खास पुणेरी! लोकांना रोखण्यासाठी मुलाची युक्ती, ‘गाढवांनो घराबाहेर पडू नका’

या मुलाची ही पुणेरी युक्ती कामी आली आणि त्या रस्त्यावरही वर्दळही कमी झाली.

  • Share this:

पुणे 12 एप्रिल : कोरोनाला रोखण्यासाठी घराबाहेर न पडणं हाच एकमेव उपाय असल्याचं सांगितलं जात आहे. सरकार, डॉक्टर्स आणि सगळेच लोक हे वारंवार सांगत आहेत. मात्र अनेक ठिकाणी कारण नसताना लोक रस्त्यावर येत आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन आता 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. लोक घराबाहेर पडत राहिले तर 30 तारखेनंतरही लॉकडाऊन वाढवावा लागेल असा इशारा सरकारने दिला आहे. या पार्श्वभूमीवर लोकांनी घरातच राहावं हा संदेश देण्यासाठी पुण्यात झोपडपट्टीत राहणाऱ्या एका मुलाने अनोखी युक्ती केली.

हा मुलगा लोकमान्य नगर जवळच्या सानेगुरूजी झोपडपट्टीत राहातो. लोक रस्त्यावर दिसत असल्याने त्याने एक अनोखी युक्ती केली. खडूच्या साह्याने त्याने रस्त्यावर खास पुणेरी पद्धतीने ‘गाढवांनो घराबाहेर पडू नका’ असं मोठ्या अक्षरात लिहिलं.

या मुलाची ही पुणेरी युक्ती कामी आली आणि त्या रस्त्यावरही वर्दळही कमी झाली. हे वाक्य लिहिलेला फोटा आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तब्बल 134 रुग्णांची संख्या वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 113 रुग्ण हे मुंबईतच आढळले आहे.

तुळजाभवानी देवस्थानचे महंतांवर गुन्हा, वाढदिवसाचे निमित्त साधत गोळा केली गर्दी

महाराष्ट्राला कोरोना व्हायरसने घातलेला विळखा वाढतच चालला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्याही 1895 वर पोहोचली आहे.  गेल्या 24 तासात मुंबई, पुणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

कोरोनाचं व्हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत 113 रुग्ण आढळले आहे. वरळी, कोळीवाडा, धारावी आणि उपनगरात नवे रुग्ण आढळले आहे. वसई आणि विरारनंतर आता मीरा भाईंदरमध्येही रुग्णांची संख्या वाढली आहे. आज सकाळपर्यंत  मीरा भाईंदरमध्ये 7 नवे रुग्ण आढळले आहे.  तर पुण्यात 4 रुग्ण आढळून आले. नवी मुंबई, ठाणे महापालिका, वसई विरार इथं प्रतेकी 2 रूग्णांची वाढ झाली आहे.  तर रायगड, अमरावती, भिवंडीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

होम क्वारंटाइनमध्ये एकटं राहणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, सडलेल्या अवस्थेत मिळालं शव

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात 24 तासांत 909 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे. तर अद्यापही 2 हजार नागरिकांचे रिपोर्ट्स येणं बाकी आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 24 तासांत कोरोनामुळे 34 तर आतापर्यंत 273 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतात रुग्णांची संख्या 8,356 वर पोहोचली आहे. त्यापैकी 7,367 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 716 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामध्ये सर्वात लहान 6 वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.

 

First published: April 12, 2020, 4:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading