Home /News /pune /

परीक्षेनंतर ही चूक पडली महागात, पुण्यात 24 तास उलटले तरीही तरुण बेपत्ता

परीक्षेनंतर ही चूक पडली महागात, पुण्यात 24 तास उलटले तरीही तरुण बेपत्ता

महेश रमेश शेंडगे (वय वर्षे 22)असं बुडालेल्या तरुणाचं नाव आहे. महेश हा डिप्लोमाची परीक्षा देऊन 7 ते 8 मित्रांसोबत पोहण्यासाठी आमराई तलावामध्ये गेला होता.

पुणे, 04 मार्च : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील KJ इन्स्टिट्यूट ऑफ कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी तलावामध्ये बुडल्याची घटना घडली आहे. पुरंदर तालुक्यातील भिवरी इथल्या आमराई तलावात हा प्रकार घडला आहे. बुडालेला तरुण KJ इन्स्टिट्यूट ऑफ कॉलेजमध्ये डिप्लोमाचं शिक्षण घेत होता. परीक्षा झाल्यानंतर तो मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असल्याची माहिती देण्यात आली आहे. महेश रमेश शेंडगे (वय वर्षे 22)असं बुडालेल्या तरुणाचं नाव आहे. महेश हा डिप्लोमाची परीक्षा देऊन 7 ते 8 मित्रांसोबत पोहण्यासाठी आमराई तलावामध्ये गेला होता. त्यावेळी ही खळबळजनक घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी 3च्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होतं. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या अंधारात शोधकार्यास अडथळा येत असल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं. सकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आलं आहे. महेश मूळचा दौंड तालुक्यातील मलठन या गावचा आहे. या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये सासवड पोलीस अधिक तपास करीत आहे. दरम्यान, ही घटना कशी घडली याचा पोलीस अधिक तपास करत असून महेशच्या मित्रांचीदेखील चौकशी करण्यात येत आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:

पुढील बातम्या