मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात घडली लाज आणणारी घटना, गावाकडून आलेल्या तरुणासोबत घडलं असं काही...

पुण्यात घडली लाज आणणारी घटना, गावाकडून आलेल्या तरुणासोबत घडलं असं काही...

स्थानिकांनी केलेल्या मदतीमुळे या तरुणाने कसाबसा आपला जीव वाचवत तिथून पळ काढला.

स्थानिकांनी केलेल्या मदतीमुळे या तरुणाने कसाबसा आपला जीव वाचवत तिथून पळ काढला.

स्थानिकांनी केलेल्या मदतीमुळे या तरुणाने कसाबसा आपला जीव वाचवत तिथून पळ काढला.

  • Published by:  Akshay Shitole
पुणे, 14 मे : जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने भारतातील नागरिकांनाही मेटाकुटीला आणलं आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत आला तरी कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. तर लॉकडाऊनमुळे अनेकांच्या आयुष्यात दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रोजी-रोटीसाठी आपलं गाव सोडून शहराकडे आलेल्या कामगारांसाठी तर हे संकट सर्वाधिक वेदनादायी ठरत आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्यानंतर अनेक मजुरांनी गावाची वाट धरली आहे. मात्र अशातच पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेला यवतमाळ येथील तरुण चालत गावाकडे निघाला. मात्र वाटेत त्याच्यासोबत जे घडलं ते संताप आणणारं आहे. पुण्यातील संगमवाडी परिसरातील ब्रीजवर काही विकृत प्रवृत्तींनी या तरुणाला अडवलं. तसंच त्याला मारहाण करून त्याचा मोबाइल आणि पैसे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. काही स्थानिकांनी केलेल्या मदतीमुळे या तरुणाने कसाबसा आपला जीव वाचवत तिथून पळ काढला. या सगळ्या प्रकाराबाबत एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. समाजकंटकांच्या तावडीतून त्या तरुणाला वाचवणाऱ्या पुण्यातील एका तरुणाने हा व्हिडिओ चित्रित केला आहे. 'पुणे पाटील इस्टेट ते संगमवाडी ब्रिज इथली एक घटना' अशा कॅप्शनसह पुण्यातील तरुणाने हा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला आहे. समाजकंटकांच्या विकृतीचा बळी पडलेला वाटसरू तरूण वेदनेमुळे हुंदके देत असल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे. तसंच या तरुणाने आपली आपबीतीही या व्हिडिओत सांगितली आहे. 'मला 2-3 तरुणांनी अडवलं आणि माझा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला मारहाणही केली,' असं हा तरुण सांगत आहे. एकीकडे संकटात एकमेकांना साथ देण्याचं सकारात्मक चित्र समोर येत असताना पुण्यातून व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे संपात व्यक्त करण्यात येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मात्र 'न्यूज18 लोकमत' या व्हिडिओची आणि त्यातील घटनेच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. संकलन, संपादन - अक्षय शितोळे
First published:

Tags: Coronavirus, Lockdown, Pune news

पुढील बातम्या