पुणेकरांना आशेचा किरण; नव्या Covid रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

पुणेकरांना आशेचा किरण; नव्या Covid रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. वाढती रुग्णसंख्या, अपूरी आरोग्य सुविधा यामुळे नागरिकांची चिंता वाढली होती. दरम्यान एक सराकारात्मक बातमी समोर आली आहे.

  • Share this:

पुणे, 22 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाने (Coronavirus) हाहाकार माजवला आहे. वाढती रुग्णसंख्या, अपूरी आरोग्य सुविधा यामुळे नागरिकांची चिंता वाढली होती. दरम्यान एक सराकारात्मक बातमी समोर आली आहे. गेल्या 6 दिवसात शहरात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आजपासून लॉकडाऊन (Strict Lockdown) अधिक कडक असल्याने येत्या काही दिवसात ही संख्या अधिक कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (More recoveries than new Covid patients in pune)

गेल्या आठवड्यापासून पुण्यात कोरोनाबाधिकांच्या संख्येत बरीच घट पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार 16 ते 21 एप्रिल या दरम्यान शहरात सुमारे 27 हजार 694 रुग्ण सापडले असून बरे झालेल्यांची संख्या 35 हजार 175 इतकी आहे.

हे ही वाचा-पुण्यातील 'हे' रुग्णालय कोरोनाग्रस्तांसाठी ठरतंय वरदान; मृत्यूदर अवघा 0.1 टक्के

गेल्या 24 तासात 4539 पाझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून 4851 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात 80 रुग्णांचा मृत्यू झाला असून यापैकी  24 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. 1313 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 387030 असून ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 51552 इतकी आहे.

- एकूण मृत्यू -6330.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 329148.

- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी - 22277

बरे होणाऱ्यांची संख्या अधिक...

16 एप्रिल – नवीन रुग्ण 5373 – बरे झालेले 5049

17 एप्रिल – नवीन रुग्ण 6006 – बरे झालेले 5609

18 एप्रिल – नवीन रुग्ण 6634 – बरे झालेले 4712

19 एप्रिल – नवीन रुग्ण 4587 – बरे झालेले 6473

20 एप्रिल – नवीन रुग्ण 5138 – बरे झालेले 6802

21 एप्रिल – नवीन रुग्ण 5529 – बरे झालेले 6530

22 एप्रिल – नवीन रुग्ण 4539 – बरे झालेले 4851

Published by: Meenal Gangurde
First published: April 22, 2021, 8:11 PM IST

ताज्या बातम्या