मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

त्रास देते म्हणून अल्पवयीन मुलाने आईच्या डोक्यात घातला कोयत्या, पुण्यातील घटना

त्रास देते म्हणून अल्पवयीन मुलाने आईच्या डोक्यात घातला कोयत्या, पुण्यातील घटना

 शाब्दिक वाद घालत आरोपीने आपल्याजवळ असलेल्या कोयत्याने रेखा जाधव यांच्या डोक्यावर हल्ला चढवत सपासप वार केले.

शाब्दिक वाद घालत आरोपीने आपल्याजवळ असलेल्या कोयत्याने रेखा जाधव यांच्या डोक्यावर हल्ला चढवत सपासप वार केले.

शाब्दिक वाद घालत आरोपीने आपल्याजवळ असलेल्या कोयत्याने रेखा जाधव यांच्या डोक्यावर हल्ला चढवत सपासप वार केले.

  • Published by:  sachin Salve
आनिस शेख, प्रतिनिधी मावळ, 15 जुलै: आई (mother) आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातील तळेगाव दाभाडे (Talegaon Dhamdhere Pune) इथं घडली आहे. सावत्र आई त्रास देते म्हणून एका अल्पवयीन मुलाने  कोयत्याने वार करून आईची निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे तळेगाव दाभाडेमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील श्रीहरी कॉलनीत राहणाऱ्या रेखा जाधव या 40 वर्षीय महिलेचा तिच्या अल्पवयीन सावत्र मुलाने तिक्ष्ण कोयत्याने हल्ला चढवून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास श्रीहरी कॉलनी येथे घडली. टीम इंडियाला कोरोनाचा धोका वाढला! ऋषभ पंतनंतर आणखी एक जण पॉझिटिव्ह संबंधित खुनाच्या घटनेत मयत रेखा जाधव हिचे ऐकून पती अरविंद हा दुसरी बायको तसंच घटनेतील आरोपीच्या कुटुंबीयांना मारहाण आणि त्रास देत असत. सावत्र आई तसंच वडील यांच्याकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून कायमचा काटा काढण्यासाठी अल्पवयीन मुलाने   स्वतःजवळ तीक्ष्ण कोयता बाळगत होता. नोकरी करणाऱ्यांना PNB देत आहे 3 लाखांचा लाभ, झिरो बॅलन्स असेल तरीही मिळतील पैसे बुधवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास तो रेखा जाधव यांच्या घरी पोहोचला. तिच्यासोबत शाब्दिक वाद घालत आरोपीने आपल्याजवळ असलेल्या कोयत्याने रेखा जाधव यांच्या डोक्यावर हल्ला चढवत सपासप वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. तळेगाव पोलिसांनी संबंधित घटनेतील अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.
First published:

Tags: Crime, Murder, Pune news, Small child

पुढील बातम्या