Home /News /pune /

पुण्यात अल्पवयीन मुलाची 11 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

पुण्यात अल्पवयीन मुलाची 11 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

अथर्व विकास पाटील ( वय-14, रा. कुशल स्वर्णाली, चौथा मजला, खराबवाडी) असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. हा मुलगा आठवीत शिकत होता.

पुणे, 27 ऑगस्ट: खेड तालुक्यातील चाकण जवळच्या खराबवाडी येथील कुशल स्वर्णाली गृह प्रकल्पाच्या 11 व्या मजल्यावरून अल्पवयीन मुलाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर जखमी अवस्थेत मुलाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे हा मुलगा 11 व्या मजल्यावर जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हेही वाचा...धक्कादायक! थोरल्यानं दारूच्या नशेत धाकट्याला संपवलं, शिवसेना वसाहतीतील थरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (25 ऑगस्ट) रोजी रात्री 10 वाजून 5 मिनिटांनी घडली. अथर्व विकास पाटील ( वय-14, रा. कुशल स्वर्णाली, चौथा मजला, खराबवाडी) असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. हा मुलगा आठवीत शिकत होता. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. विशेष म्हणजे त्याला एक जुळा भाऊ असून त्यानं आपल्या भावाच्या मृत्यूचा धसका घेतला आहे. या घटनेनंतर केवळ तीन मिनिटांत आपल्याh जुळ्या भावाला पाहायला तो वरच्या मजल्यावर गेला. ही घटना आपल्या आई-वडिलांना प्रथम सांगितली. त्यानंतर हा जुळा भाऊ रात्रभर तापाने फणफणला होता, असे तेथील रहिवाशांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सपकाळ हे पुढील तपास करीत आहेत. पुण्यात निवृत्त पोलिसाला तीक्ष्ण शस्त्राने वार करत लुटले दुसरीकडे, पुण्यात एका सेवानिवृत्त पोलिसावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास पुण्यातील शिवाजी रस्त्यावर घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हेही वाचा...कर्मचाऱ्याचा मृतदेह घरी पोहोचविण्यासाठी कंपनीने खर्च केले 50 लाख; प्लेन केलं बुक याप्रकरणी प्रकाश जयकुमार बुरले (वय-58) यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी प्रकाश बुरले यांच्या खिशातील मोबाइल हिसकावून नेला आहे. दरम्यान, बुरेल यांनी चोरट्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर चोरट्यांनी तीक्ष्ण शस्त्राने वार करून चोरट्यांनी पळ काढला. बुरले नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या ते स्वारगेट पोलीस वसाहतीत राहायला आहेत.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Pune news

पुढील बातम्या