पुण्यातील जंगली महाराज रोडवर भीषण आग, 10 ते 15 गाड्या जळून खाक

पुण्यातील जंगली महाराज रोडवर भीषण आग, 10 ते 15 गाड्या जळून खाक

या आगीत 10 ते 15 गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

  • Share this:

पुणे, 27 फेब्रुवारी : पुण्यातील जंगली महाराज रोडलगत असलेल्या वाहनांना भीषण आग लागली. दुपारच्या सुमारास लागलेल्या या आगीने नंतर रौद्र रूप धारण केलं. अखेर तीन फायर बंबच्या साहाय्याने ही आग विझवण्यात आली.

वाहतूक विभागानं शहरातील गुन्ह्यात आणि ओढून आणलेल्या गाड्या महापालिकेच्या जागेत काही वर्षांपासून ठेवलेल्या आहेत. साधारण हजाराच्या आसपास दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या आहे. या वाहनांना दुपारी अचानक आग लागली आणि ही आग वाढतंच गेली. त्यामुळे या परिसरात काही काळासाठी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

हेही वाचा - Pune Coronavirus: बुधवार पेठेतील रात्रीची गर्दी रोखण्यासाठी पोलीस सज्ज, गर्दी केल्यास कारवाईचा बडगा

जागा दाटीची असल्यानं इतरही वाहनांना ती आग लागली. या आगीत 10 ते 15 गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. चारचाकी वाहनांसह जेसीबीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

दरम्यान, अग्निशमन विभागाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: February 27, 2021, 5:46 PM IST

ताज्या बातम्या