Home /News /pune /

BREAKING : पुण्यात अग्नितांडव, कोपरेगावामध्ये गॅरेजला भीषण आग, 14 बसेस जळून खाक

BREAKING : पुण्यात अग्नितांडव, कोपरेगावामध्ये गॅरेजला भीषण आग, 14 बसेस जळून खाक

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, केमिकलचा स्फोट झाल्याने ही आग लागली.

पुणे, 07 ऑगस्ट : पुण्यातील कोपरेगावामध्ये (koparegaon) एका गॅरेजला भीषण आग (fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 14 बसेस जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, आगीमध्ये दोन जण गंभीर भाजले आहे. आग आटोक्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोपरे गावात एक बस मॉडिफाय करणारे गॅरेज आहे. या गॅरेजला रात्री अचानक भीषण आग लागली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, केमिकलचा स्फोट झाल्याने ही आग लागली. आग लागून 14 बसेस जळून खाक झाल्या आहेत. ही आग इतकी भीषण आहे की, आगीचे लोळ दूरपर्यंत दिसून येत आहे. केमिकलचा स्फोट झाल्यानंतर आगीने रौद्ररुपधारण केले आणि बघता बघता गॅरेज आगीच्या भक्षस्थानी सापडले. या आगीत 14 बसेस पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, गावकऱ्यांनी शिक्षकाला कपडे फाटेपर्यंत मारलं, video

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आणि अखेर  अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांच्या साहाय्याने आग विझवण्यात यश आले आहे. आगीमध्ये दोन जण गंभीर भाजले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या