S M L

उकळतं दुध अंगावर पडल्यामुळे दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

हे दुखद प्रकरण पुण्याच्या वडगाव धायरीमध्ये घडलं आहे.

Updated On: Jul 31, 2018 12:55 PM IST

उकळतं दुध अंगावर पडल्यामुळे दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

पुणे, 31 जुलै : अंगावर दुध सांडल्याने अनेकांनी आपला जीव गमावला आहे. असाच एका प्रकारामुळे पुण्याच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. इथे एका कुटुंबातील चिमुकलीने उकळत्या दुधामुळे आपले प्राण गमावले आहेत.

हे दुखद प्रकरण पुण्याच्या वडगाव धायरीमध्ये घडलं आहे. इथे राहणाऱ्या कुलकर्णी कुटुंबातील दीड वर्षाची चिमुकली भार्गवी अक्षय कुलकर्णीवर घरात उकळत दूध सांडलं. यानंतर भार्गवीने आरडाओरड सुरू केली, त्यानंतर कुटंबीयांनी तिच्याकडे धाव घेतली. भार्गवीला त्या अवस्थेत पाहूण तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. गंभीर अवस्था पाहून तिला लगेच ससून रुग्णालयात भरती करण्यात आलं.

मुंबई- पुणे इंटरसिटी एक्सप्रेस अपघात टळला

ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही भार्गवीचा जीव वाचू शकला नाही. दूध अंगावर सांडल्यामुळे या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. भार्गवीच्या अशा अकाली जाण्यामुळे कुलकर्णी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान पुणे पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. प्रत्यक्षदर्शी आणि कुटुंबातील सदस्यांचीही या प्रकरणात साक्ष नोंदवली जाणार आहे.

Loading...

भार्गवीच्या या जाणामुळे संपूर्ण धायरी परिसरात दुखाचं सावट पसरलं आहे. पण या संगळ्यात काळजी न घेतल्यामुळे भार्गवीवर हा प्रसंग ओढावला. त्यामुळे घरात लहानग्यांची काळजी घेणं फार गरजेच आहे.

हेही वाचा...

चाकण हिंसाचाराचा घटनाक्रम

...म्हणून शेवटच्याक्षणी सौरभ गांगुलीने घेतला होता धोनीला तिसऱ्या स्थानावर पाठवायचा निर्णय

आता तुमचं घरच तुम्हाला देईल पेन्शन, अनेक बँकांनी सुरू केली स्कीम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 31, 2018 12:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close