हॅन्ड ब्रेक न लावल्याने महामार्गावर रिव्हर्स धावू लागली चारचाकी; पुण्यातील थरारक घटनेचा LIVE VIDEO
हॅन्ड ब्रेक न लावल्याने महामार्गावर रिव्हर्स धावू लागली चारचाकी; पुण्यातील थरारक घटनेचा LIVE VIDEO
पुणे जिल्ह्यातील मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर ही घटना घडली. याठिकाणी माल वाहतूक करणाऱ्या चारचाकीचा हॅन्ड ब्रेक न लावल्यामुळे ही गाडी थेट रिव्हर्स येत पुणे नाशिक महामार्गावर गेली.
पुणे 26 मार्च : दुर्घटना कधी आणि कुठे होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे विशेषतः रस्त्यावरून चालताना तर भरपूर सतर्क राहाण्याचा नागरिकांना सल्ला दिला जातो. अनेकदा आपली चूक नसतानाही रस्त्यावर आपल्याला मोठ्या दुर्घटनांना सामोरे जावं लागतात. भीषण अपघाताचे अनेक व्हिडिओ (Shocking Accident Videos) समोर येत असतात. मात्र, यातील काही घटनांमध्ये अगदी थोडक्यात मोठी दुर्घटना टळल्याचंही पाहायला मिळतं. सध्या असाच एक व्हिडिओ पुण्यातून समोर आला आहे.
Pune Airport expansion: पुणे विमानतळच्या मुद्द्यावर राजकारण तापलं, विस्तारीकरणावरुन भाजपतील गटबाजी उघड
पुणे जिल्ह्यातील मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर ही घटना घडली. याठिकाणी माल वाहतूक करणाऱ्या चारचाकीचा हॅन्ड ब्रेक न लावल्यामुळे ही गाडी थेट रिव्हर्स येत पुणे नाशिक महामार्गावर गेली. सुदैवाने यावेळी मोठा अपघात होता होता वाचला, या घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र मोठा अनर्थ टळला आहे.
हॅन्ड ब्रेक न लावल्याने महामार्गावर रिव्हर्स धावू लागली गाडी;
पुणे-नाशिक महामार्गावरील थरारक घटनेचा LIVE VIDEO pic.twitter.com/EQ7m6rEGsP
विशेष बाब म्हणजे या चारचाकीमध्ये लोखंडी फ्रेम होत्या त्यामुळे दुचाकी किंवा पायी चालणाऱ्या व्यक्ती गाडीच्या कचाट्यात आल्या असत्या तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. ही संपूर्ण घटना तिथेच लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटना घडली तेव्हा याठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनीही घटनेबद्दल माहिती दिली.
एक धडक अन् स्वप्नांचा झाला चक्काचूर; पुण्यात सायकलपटू युवतीचा हृदयद्रावक मृत्यू
व्हिडिओमध्ये दिसतं की लहान टॅम्पो बाजार समितीच्या बाहेर रस्त्याच्या कडेला उभा आहे. यात मागील बाजूला लोखंडी फ्रेमही आहेत. या गाडीचा हॅन्ड ब्रेक न लावल्यामुळे अचानक ही गाडी वेगात मागे जाऊ लागते. गाडी रस्ता ओलांडून शेजारीच असलेल्या एक टपरीला धडकते. यानंतर तिथे उभा असलेला एक तरुण धावत गाडीमध्ये बसतो आणि परिस्थिती नियंत्रणात आणतो. सुदैवाने रहदारीच्या रस्त्यावरही कोणीही या गाडीच्या कचाट्यात येत नाही. यामुळे मोठी दुर्घटना टळली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.