पुणे-सोलापूर महामार्गावर 'बर्निंग बस'चा थरार, LIVE VIDEO

सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला आग लागली. ही दुर्घटना सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली.

सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला आग लागली. ही दुर्घटना सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली.

  • Share this:
    सुमित सोनावणे, प्रतिनिधी दौंड, 26 डिसेंबर : पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway)बर्निंग कारचा थरार पाहण्यास मिळाला. खासगी ट्रॅव्हल्स बसला भीषण आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यात बस जळून खाक झाली आहे. सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला आग लागली. ही दुर्घटना सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास लोणीकाळभोर जवळील हॉटेल मनालीसमोर घडली. पुण्याकडे भरधाव वेगाने जात असताना अचानक बसने पेट घेतला. बसने अचानक पेट घेतला बसच्या चालकाला बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच प्रसंगावधाने बस बाजूला घेतली. बस बाजूला घेऊन बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला. आग विझवण्यासाठी घटनास्थळावर जवळच असलेल्या वाघोलीच्या अग्निशामक गाड्यासह पुणे फायर दाखल झाले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर अखेर आग आटोक्यात आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
    Published by:sachin Salve
    First published: