मराठी बातम्या /बातम्या /पुणे /बापानंच केला ४ महिन्यांच्या मुलाला जमिनीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न

बापानंच केला ४ महिन्यांच्या मुलाला जमिनीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न

एका व्यसनाधीन पित्याने आपल्या चार महिन्याच्या बाळाला जमींनवर आपटून मारण्याचा प्रयत्न केला आहे.

एका व्यसनाधीन पित्याने आपल्या चार महिन्याच्या बाळाला जमींनवर आपटून मारण्याचा प्रयत्न केला आहे.

एका व्यसनाधीन पित्याने आपल्या चार महिन्याच्या बाळाला जमींनवर आपटून मारण्याचा प्रयत्न केला आहे.

    02 मे : पिंपरी चिंचवडमध्ये दारु पिणाऱ्या नराधमांकडून मानुसकीला काळीमा फासणाऱ्या दोन घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेमध्ये एका व्यसनाधीन पित्याने आपल्या चार महिन्याच्या बाळाला जमींनवर आपटून मारण्याचा प्रयत्न केला आहे. तर, दुसऱ्या घटनेमध्ये एका व्यसनाधीन भावाने आपल्याच बहिनीवर बलात्कार केल्याची घटना उघडिकिस आली आहे. या दोन्हीही घटनांमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

    या दोन्ही घटनांमधील आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यांन, पत्नीने दारुसाठी ठेवलेले पैसे का मागीतले म्हणून नराधम बापाने आपल्या चिमुकल्याला जमिनीवर आपटून बेदम मारहाण केली आहे. यावेळी जमावाने आणि त्याच्या पत्नीने त्याला बेदम मारहाण केली आहे. त्याचा व्हिडिओ आसा जोरदार व्हायरल होत आहे.  मारहाण केलेल्या त्या चिमुकल्यावर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

    आरोपी असलेला बाप सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दोन्हीही घटनेंसाठी परिसरात हळ हळ व्यक्त केली जात असून या घटनांमुळे दारुचे दुष्परिणाम किती वाईट असतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

     

    First published:

    Tags: Pune, पुणे, मारहाण