Home /News /pune /

एक Facebook पोस्ट आणि पिंपरीतील 'भाईचा बड्डे' थेट पोलीस कोठडीत

एक Facebook पोस्ट आणि पिंपरीतील 'भाईचा बड्डे' थेट पोलीस कोठडीत

पिंपरीत गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. भरदिवसा गुंड धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याच्या घटना समोर येत आहेत.

    पुणे, 20 मे: पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे गुंडगिरीच्या अनेक घटना समोर येत असतात. आपली दहशत निर्माण करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयत्न करत असल्याचं पहायला मिळतं. अशाच प्रकारे एका भाईला आपली दहशत निर्माण करणं चांगलंच भोवलं आहे. वाढदिवसाच्या (Birthday) दिवशी फेसबूकवर अशी एक पोस्ट (Facebook post) टाकली की त्यामुळे त्याला थेट कोठडीत जावं लागलं. झालं असं की, पिंपरीत राहणारा अजय काळभोर याचा बुधवारी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी या भाईने फेसबूकवर एक पोस्ट टाकली. ज्यामध्ये म्हटलं होतं, "कुछ दिन और सही, बहोत बडा धमाका होगा, पूरे पिंपरी चिंचवड में अपनाही नाम होगा". या पोस्टवर त्याच्या दुसऱ्या सहकाऱ्यानेही तात्काळ कमेंट केली. काळभोर याचा साथीदार असलेल्या प्रशांत सोनावणे याने त्याला शुभेच्छा देत म्हटलं, "भाऊ आमचा बाप तुमचा". Pune Crime : एवढा कसला राग! 13 वर्षाच्या मुलाने जन्मदात्या पित्याची केली निर्घृण हत्या, कारण अगदीच क्षुल्लक पुणे-पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस नेहमीच सतर्क असतात. तसेच पोलीस सोशल मीडिया अकाऊंटवरही नजर ठेवून असतात. याच दरम्यान पोलिसांना ही फेसबूक पोस्ट दिसली आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अजय विलास काळभोर, त्याचा साथिदार अनिल प्रशांत सोनावणे आणि काळभोर याचं फेसबूक अकाऊंट सांभाळणारा सोमनाथ देवाडे यांना बेड्या ठोकल्या. यामुळे या 'भाई'ला आपला वाढदिवस कोठडीतच साजरा करावा लागला. पोलिसांनी या आरोपींना न्यायलयात गुरुवारी हजर केले असता त्यांना जामिनावर सोडून देण्यात आले.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime news, Pimpri chinchavad, Pune

    पुढील बातम्या