Home /News /pune /

पुण्यात मद्यधुंद कार चालकानं दोघांना उडवलं, सिंहगड रस्त्यावरील घटना

पुण्यात मद्यधुंद कार चालकानं दोघांना उडवलं, सिंहगड रस्त्यावरील घटना

पुण्यात दारुच्या नशेत तर्रर होऊन बेदरकारपणे गाडी चालवून एका तळीरामानं दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

पुणे, 17 डिसेंबर: पुण्यात दारुच्या नशेत तर्रर होऊन बेदरकारपणे गाडी चालवून एका तळीरामानं दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील राज हॉटेलच्या समोर ही घटना घडली. एका मद्यधुंद कार चालकानं दुचाकीवरील दोघांना जोरदार धडक दिली. दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं उपचारासाठी नवले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हेही वाचा...पत्रकारांनी प्रश्न विचारताच चंद्रकांत पाटील म्हणाले कोण संजय राऊत? विनोदकुमार रझ्झाक आणि इमरान अब्दुल्ला शेख (रा. नांदेड, ता .हवेली) अशी या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वारांची नावं आहेत. दोघांच्याही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. तर आकाश बंडगर हा मद्यधुंद अवस्थेत चारचाकी चालवत होता. त्याच्यासोबत गणेश मेहेत्रे ( दोघे राहणार सोमवार पेठ, पुणे) हा गाडीत बसला होता. आकाश बंडगर यांनं बेदरकारपणे गाडी चालवून दुचाकीवरून सिंहगड रोडवरून जाणाऱ्या विनोदकुमार आणि इमरान शेख या दोघांनी उडवलं. त्यानंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून आपल्या चारचाकी गाडीतून पळ काढला. मात्र, गोऱ्हे बुद्रुक येथील तरुणांनी त्यांचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून डोणजे फाट्याजवळ गाठलं. नंतर त्यांना पुन्हा अपघातस्थळी आणण्यात आलं. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी खानापूर येथील रुग्णवाहिकेला फोन करून जखमींना नवले हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था केली. दोन्ही आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पोलीस दोघांचा चौकशी करत आहेत. हेही वाचा...हुंड्याने घेतला असहाय्य बापाचा जीव; नवरदेवाच्या एका निर्णयामुळे कुटुंब उद्ध्वस्त साहेबांनी गाडीतून उतरण्याची तसदी घेतली नाही.... अपघात घडल्यानंतर काही वेळातच हवेली पोलीस स्टेशनची व्हॅन अपघातस्थळी पोहोचली. रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. जखमी झालेले दोघे रस्त्याच्या कडेला विव्हळत पडलेले होते. पोलीस गाडीचे चालक व एक होमगार्ड यांनी खाली उतरून जखमींची माहिती घेतली. जखमींना रुग्णवाहिकेत बसविण्यास मदत केली. मात्र, एवढा मोठा अपघात झालेला असताना पोलीस व्हॅनमध्ये बसलेल्या 'साहेबांनी'खाली उतरण्याची साधी तसदीही घेतली नाही, याबाबत स्थानिक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Maharashtra, Pune, Pune crime, Pune news

पुढील बातम्या