Home /News /pune /

पुणे-सोलापूर महामार्गावर धावत्या कारने घेतला अचानक पेट, गाडी पूर्णपणे जळून खाक

पुणे-सोलापूर महामार्गावर धावत्या कारने घेतला अचानक पेट, गाडी पूर्णपणे जळून खाक

पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या चारचाकी कारने अचानक पेट घेतला.

    सुमित सोनवणे, दौंड, 29 नोव्हेंबर : पुणे सोलापूर महामार्गावरील खडकी-रावणगावच्या हद्दीत धावत्या कारने पेट घेतल्याची घटना घडली आहे. पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या चारचाकी कारने अचानक पेट घेतला. कारने पेट घेतल्याचं लक्षात येताच कारमधून प्रवास करणारे दोघेही बाहेर उतरल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र कारने चारही बाजूने पेट घेतल्याने महामार्गावर कार जळून खाक झाली आहे. ही आग वीजवण्यासाठी दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील स्थानिक अग्निशामक दलाचे बंब बोलविण्यात आले होते. त्यामुळे चारचाकीच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं. महामार्गावर कालच झाला होता अपघात पुणे सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ हद्दीमध्ये शनिवारी देखील एक अपघात झाला होता. भरधाव कंटेनरने कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये 1 जण जागीच ठार झाला, तर कुटुंबातील अन्य 4 जण जखमी आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ हद्दीत सोलापूरकडून पुण्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने समोरील कारला जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कारमध्ये प्रवास करणाऱ्या 60 वर्षीय पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. संजय कुमार पोपटलाल असं मृत व्यक्तीचं नाव असून कुटुंबातील इतर सदस्य किरकोळ जखमी झाले आहेत.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Pune (City/Town/Village)

    पुढील बातम्या