Home /News /pune /

आषाढी वारीबाबत मोठी माहिती, पादुका मंदिराबाहेर नेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली

आषाढी वारीबाबत मोठी माहिती, पादुका मंदिराबाहेर नेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली

12 तारखेला पालखी प्रस्थान असून मंदिरांमध्ये पालखी, पालखी रथ, अब्दगिरी गरुडटक्के, चौरंग, पाट पादुका या सर्वांना चांदीचा मुलामा देण्याचे काम सुरू आहे.

पिंपरी चिंचवड, 8 जून: जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी 12 जून आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 13 जून रोजी प्रस्थान करणार आहे. पालखी प्रस्थान सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. जगद्गुरू तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली या दोन्ही संस्थानची सोमवार बैठक पार पडली. पादुका मंदिराबाहेर नेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा करता येतो तर पालखी सोहळा का करता येणार नाही, अशी मागणी वारकऱ्यांनी केली होती. ही मागणी पोलिसांनी फेटाळली आहे. आता पालखी प्रस्थान सोहळा किती मानकऱ्यांच्या उपस्थितीत करायचा याबाबत राज्य सरकारकडून सूचनांसाठी एक नवा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हेही वाचा... कोण आहे सचिन वझे? महाराष्ट्र पोलिस सेवेत तब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा झाला रुजू प्रस्थान ठेवल्यानंतर तुकाराम महाराजांच्या पादुका भजनी मंडपातच विसावतील तर मंदिर प्रदक्षणा झाल्यानंतर शासननिश्चित करेल. त्या ठिकाणी माऊलींच्या पादुका विसावतील. देहू पालखी सोहळाप्रमुख माणिक महाराज मोरे आणि आळंदी मंदिर समितीचे मुख्यविश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील यांनी ही माहिती दिली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. 12 तारखेला पालखी प्रस्थान असून मंदिरांमध्ये पालखी, पालखी रथ, अब्दगिरी गरुडटक्के, चौरंग, पाट पादुका या सर्वांना चांदीचा मुलामा देण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा इतिसाहासात पहिल्यांदाच रद्द करावा लागला आहे. मात्र माऊली आणि इतर संतांच्या पादुका श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मात्र नेण्यात येणार आहेत. त्या कशा न्यायच्या यावर अजुन निर्णय झालेला नाही. पालखी सोहळ्यात महाराष्ट्रातून तब्बल 10 लाख भाविक पायी चालत पंढरपूरला जात असतात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जिवनातला हा सर्वात मोठा सोहळा मानला जातो. हेही वाचा...गंगेत वाहून जात होती आई, 16 वर्षीय लेकीनं नदीत उडी मारली आणि... संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदीमधून आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी देहूमधून महिनाभर आधी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात. त्याचबरोबर महाराष्ट्रातून विविध संतांच्या शेकडो दिंड्याही त्यात येवून मिसळतात. तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त वैष्णवांचामेळा हा आपल्या लाडक्या दैवताला भेटण्यासाठी जात असतो. या वारी परंपरेला शेकडो वर्षांची परंपरा आहे. वादळ, वारा, उन, पाऊस अशा कशाचीही तमा न बाळगता वारकरी कुठल्याही संकटाची पर्वा न करता अतिशय आनंदात या सोहळ्यात सहभागी होत असतात.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या