Home /News /pune /

अझीम प्रेमजींनी करून दाखवलं, दीड महिन्यातच पुण्यात उभारलं 'कोरोना हेल्थ सेंटर'

अझीम प्रेमजींनी करून दाखवलं, दीड महिन्यातच पुण्यात उभारलं 'कोरोना हेल्थ सेंटर'

मोठे दानशूर अशी ओळख असलेले प्रसिद्ध उद्योगपती आणि विप्रो कंपनीचे मालक यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे.

    पुणे, 14 जून: मोठे दानशूर अशी ओळख असलेले प्रसिद्ध उद्योगपती आणि विप्रो कंपनीचे मालक यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे. प्रेमजींनी पुण्यातील हिंजवडी भागात भारतातील पहिले कोरोना हॉस्पिटल उभारलं आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आर्थिक मदत करणाऱ्यांमध्ये अझीम प्रेमजी यांचा तिसरा क्रमांक आहे. त्यांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्या हॉस्पिटल उभारणार असा शब्द दिला होता. हेही वाचा.. कोविड हॉस्पिटलमध्ये शिरलं पूराचं पाणी, समोर आला अंगावर काटा उभा करणारा VIDEO पुण्यातील हिंजवडी भागात असलेल्या विप्रो कंपनीच्य इमारतमध्ये हे हॉस्पिटल सुरू करण्यात आलं आहे. गेल्या गुरूवारी कोरोना हॉस्पिटलचं उद्घाटन झाल. 1.8 लाख वर्गफूट जागेत हॉस्पिटल नावारुपाला आले आहे. 450 अद्ययावत बेड्स असणार असून 18 व्हेंटिलेटर आणि आयसीयू विभाग असणार आहे. मुख्यमंत्र्यानी केलं कौतुक... अझीम प्रेमजी यांनी केलेल्या वचनपूर्तीचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. पुण्यात उभारण्यात आलेलं कोरोना हॉस्पिटल हे कोरोना हेल्थ सेंटर म्हणून ओळखले जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. विप्रोतर्फे दोन सुसज्ज अॅम्ब्युलस पुरवण्यात येणार असल्याचही मुख्यमंत्र्यानी यावेळी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी अझीम प्रेमीजी आणि त्यांचे चिरंजीव रिशद प्रेमजी यांचे आभार मानले आहेत. हेही वाचा..धक्कादायक! होम क्वारंटाईन न राहता फिरले शहरभर, 4 कोरोनाबाधित रुग्णांवर गुन्हा राज्य सरकारशी सामंजस्य करार... दरम्यान, विप्रो कंपनीनं राज्य सरकारशी गेल्या 5 मे रोजी सामंजस्य करार केला होता. दीड महिन्यात पुण्यात कोरोना हॉस्पिटल उभारणार असं यावेळी अझीम प्रेमजी यांनी म्हटलं होतं. दरम्यान, जगातील अव्वल दहा दानशूर व्यक्तीमध्ये फक्त अझीम प्रेमजी यांचा समावेश आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी 1000 कोटींची मदत दिली आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी मदत करणाऱ्यांच्या यादीत अझीम प्रेमजी जगात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. अझीम प्रेमजी फाऊंडेशनसोबत विप्रो आणि विप्रो एंटरप्राइज यांच्याकडूनही मदत देण्यात आली असून एकूण रक्कम ११२५ कोटी इतकी झाली आहे. विप्रो 100 कोटी देत असून विप्रो इंटरप्रायजेस 15 कोटींची मदत आहे अझीम प्रेमजी फाउंडेशनकडून 1000 कोटी रुपये दान करण्यात आले आहेत.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Corona, Pune news, Wipro

    पुढील बातम्या