पुण्यात पतीच्या मृत्यूनंतर 8 दिवसात पत्नीचा मृत्यू, मृतदेहावर कोण करणार अंत्यसंस्कार?

पुण्यात पतीच्या मृत्यूनंतर 8 दिवसात पत्नीचा मृत्यू, मृतदेहावर कोण करणार अंत्यसंस्कार?

  • Share this:

पुणे, 27 जुलै : पुण्यातल्या धनकवडी परिसरात एका 65 वर्षीय महिलेचे कोरोनामुळे घरी निधन झालं आहे. त्यामुळे या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचं कोणी? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे तातडीने समयसूचकता दाखवून सातारा रोड - धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पहाटे 5 पर्यंत जागे राहून संगमवाडी इथल्या कैलास स्मशानभूमीत या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

धनकवडी परिसरात राहणाऱ्या 65 वर्षीय महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. या महिलेच्या पतीचंही आठ दिवसापूर्वी निधन झालं होतं. त्यांच्या घरातील सदस्यांची टेस्ट केली असता सर्वजण पॉझिटिव्ह आढळून आलेत. 2 मजली घर असल्यानं या सर्वांना 'होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यानंतर सोमवारी रात्री या महिलेला श्वास घ्यायला त्रास झालाआणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

कोरोना योद्धालाच रुग्णवाहिका नाही, पॉझिटिव्ह असतानाही चेकपोस्टवर केली ड्यूटी

घरी मृत्यू झाल्यानं हा या महिलेचा मृतदेह न्यायचा कोणी? असा प्रश्न निर्माण झाला होता. कंत्राटदारानं आपल्याला केवळ रूग्णालयातलं मृतदेहाच्या अंत्यविधीचं काम मिळालं असल्याचं सांगून घरी मृत्यू झालेला असल्यानं अंत्यविधी करण्यात असमर्थता दाखवली. शेवटी मृत्यू होऊन बराच वेळ होऊन गेलेला असल्याने महापालिकेचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख आणि त्यांच्या सहकार्यांनी स्वत पीपीई किट घातलं आणि मृतदेह पॅक करून तो स्मशानभूमीत नेला.

लॉकडाऊनमध्ये भर दिवसा खुनाचा थरार, तिघांनी एका तरुणाची केली निर्घृण हत्या

कंत्राटदाराने घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असताना स्मशानभूमीमध्ये मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. मात्र, तिथे आधीच पाच मृतदेह अंत्यसंस्कार व्हायचे बाकी होते. जर लवकर अंत्यसंस्कार करायचे असतील तर दोन हजार रूपये द्यावे लागतील अशी धक्कादायक मागणी स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचार्याने थेट पीपीई किट घातलेल्या सहाय्यक आयुक्तांकडे केली.

भारतात स्वस्त झाला सगळ्यात प्रसिद्ध android स्मार्टफोन, काय आहे नवी किंमत

शेवटी समोर कोण आहे हे समजल्यावर या कर्मचाऱ्याने गुपचूप मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यामुळे कंत्राटदाराने घेतलेली आडमुठी भूमिका आणि स्मशानभूमीत थेट अधिकार्यासमोरच घडलेल्या घटनेनंतर तरी आता महापालिका या प्रक्रियेत सुधारणा करतील का असा प्रश्न स्थानिक नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.

कोरोनाच्या काळात रूग्णांना जिवंत असताना समस्यांचा सामना तर करावाच लागतो आहे. मात्र, मृत्यूनंतरही व्यवस्थेतले मुर्दाड कसे पदोपदी बसलेत याचा प्रत्यय येतो आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 27, 2020, 2:04 PM IST

ताज्या बातम्या