Home /News /pune /

चाकणमध्ये रात्री घडला हत्येचा थरार, 36 वर्षीय युवकाचा कोयत्याने वार करून खून

चाकणमध्ये रात्री घडला हत्येचा थरार, 36 वर्षीय युवकाचा कोयत्याने वार करून खून

एका 36 वर्षीय व्यक्तीची कोयत्याने सपासप वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे.

    चाकण, 27 जुलै : राज्यात कोरोनाच्या संकटात गुन्ह्यांचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. पुण्यातही हत्येच्या अनेक घटना लॉकडाऊन दरम्यान घडल्या आहेत. चाकणच्या मेदनकरवाडीमध्ये एका 36 वर्षीय व्यक्तीची कोयत्याने सपासप वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास भर चौकात हल्लेखोरांनी इसमावर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये रक्तबंबाळ होत व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. राजेंद्र जालिंदर काळे असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मेदनकरवाडीमध्ये सिद्धिविनायक नगर इथे राजेंद्र रात्रीच्या सुमारास उभे होते. यावेळी अचानक काही हल्लेखोर आले आणि त्यांनी राजेंद्र यांच्यावर सपासप कोयत्याने वार केले. यामध्ये राजेंद्र हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. स्थानिकांनी तात्काळ राजेंद्र यांना जिल्हा रुग्णालयात नेलं पण तिथे जाण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. पलंगावरून पडला कोरोना रुग्ण, पण हॉस्पिटलच्या दुर्लक्षामुळे घडला भयंकर प्रकार नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत राजेंद्र यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरात चौकशीचं सत्र सुरू करण्यातस आलं आहे. पतीच्या मृत्यूनंतर 8 दिवसात पत्नीचा मृत्यू, मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार कोण? मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी जुन्या वादाच्या रागात हत्येची घटना घडवून आणली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस संपूर्ण परिसरात चौकशी करत असून स्थानिक आणि राजेंद्र यांच्या कुटुंबाची यात चौकशी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, यामध्ये पोलीस परिसरात सीसीटीव्हीदेखील तपासणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Pune, Pune news

    पुढील बातम्या