पुणे, 03 नोव्हेंबर : पुणे जिल्ह्यातील (Pune) कामशेतजवळील (Kamshet) ढाक बहिरी गडावर ((Dhak Bahiri caves) ट्रेकिंगसाठी गेलेल्या पिंपरीतील संत तुकारामनगर येथील एका 32 वर्षीय तरुणाचा 200 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी सकाळीही घटना घडली होती.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, प्रचिकेत काळे (Prachiket Kale) असं मृत तरुणाचं नाव आहे. प्रचिकेत हे पिंपरी चिंचवड महापालिकेत पाणी पुरवठा विभागात काम करत होते. प्रचिकेत आणि त्याचे काही मित्र सुट्टीच्या दिवशी ढाक बहिरी शिखरावर फिरायला गेले होते. ढाक बहिरी देवाचे दर्शन घेतल्यानंतर सर्वजण गडाच्या गुहेतच मुक्कामी थांबले होते.
...मग मेधा कुलकर्णींचं तिकीट का कापलं? भुजबळांचा पाटलांना सणसणीत टोला
हा अपघात घडला तेव्हा प्रतिकेत काळे यांच्यासोबत असलेले ट्रेकर सचिन शाह यांनी सांगितले की, 'शनिवारी संध्याकाळी मृत प्रतिकेत, अमृत धनगर, ओंकार जाधव आणि हेमंत फिनले या तिघांसह ढाक बहिरी येथे गेलो होतो. त्यानंतर रात्री गुहेत थांबलो. रविवारी इतर ट्रेकर्स लेण्यांकडे चढण्यापूर्वी आम्ही सकाळी लवकर खाली येण्याचे नियोजन केले होते'.
ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी सातच्या सुमारास सर्व जण खाली येत होते. दोरीच्या साहाय्याने सचिन शाह खाली उतरले. स्थानिकांनी ट्रेकर्ससाठी दोरी बांधून ठेवल्याने त्यांनी आपल्याकडे असलेला दोर वापरला नाही. प्रतिकेत काळे 20 किलो बॅकपॅक घेऊन खाली येत होते. तेव्हा अचानक दोर तुटला आणि प्रतिकेत 200 फूट खोल दरीत कोसळले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
खडसेंकडून आता महाजनांच्या गडाला सुरुंग, 250 कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल
या घटनेची माहिती स्थानिक ट्रेकर्सना मिळाली. जवळच शिवदुर्ग मित्र प्रतिष्ठानचे दोन ट्रेकर्स अनिकेत बोकील आणि दीपक पवार हे शिखरावर चढण्यासाठी सराव करत होते. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. नव्याने दोर बांधून अमृत धनगर, जाधव आणि फिनले यांना खाली आणले. त्यानंतर घाटात उतरून मृत प्रतिकेत काळे यांचा मृतदेह दुपारी 3 वाजेच्या सुमारास वर आणण्यात आला. ट्रेकर प्रतिकेत काळे यांना ट्रेकिंगची प्रचंड आवड होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. प्रतिकेत यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.