Home /News /pune /

पुण्यात कॉलेजमध्ये काम करणाऱ्या 26 वर्षीय तरुणीने केली आत्महत्या

पुण्यात कॉलेजमध्ये काम करणाऱ्या 26 वर्षीय तरुणीने केली आत्महत्या

पुण्यात आत्महत्येचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अलिकडच्या काही दिवसांतील ही पुणे शहरातील आत्महत्येची 14 वी घटना आहे.

धायरी, 26 जून : सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात 26 वर्षीय तरुणीने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर प्रकार आज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडीस आला. माधुरी तानाजी जगदाळे (वय: 26 वर्षे, रा. गणेशनगर, धायरी, ता. हवेली जि. पुणे) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी ही सिंहगड कॉलेजमध्ये अकाऊंटंट म्हणून काम करीत होती. तर तिची आई ही नवले हॉस्पिटलमध्ये कामास असून तिचा भाऊ पूना हॉस्पिटल येथे काम करतो. आज माधुरीला सुट्टी असल्याने ती घरी होती. दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान तिचा भाऊ व तीने एकत्र मिळून जेवण केले. त्यानंतर तिने भावास मी आराम करते, तू बाहेरून कुलूप लावून जा असे सांगितले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तिची आई कामावरून आल्यानंतर त्यांनी कुलूप काढून दरवाजा उघडल्यानंतर बेडरूममधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने तिने गळफास घेतल्याचे आढळून आले. हेही वाचा - पुणे परिसरातील मोठ्या दुकानाला दणका, लॉकडाउनचे नियम मोडणं पडलं महागात कुटुंबीयांनी तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले असता तिचा अगोदरच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आत्महत्येचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अलिकडच्या काही दिवसांतील ही पुणे शहरातील आत्महत्येची 14 वी घटना आहे. संपादन - अक्षय शितोळे
First published:

Tags: Pune crime news, Pune news

पुढील बातम्या