Home /News /pune /

'भाई' का म्हटला नाही? कुत्र्यासारखे बिस्कीट खायला लावून तरुणाला बेदम मारहाण, LIVE VIDEO

'भाई' का म्हटला नाही? कुत्र्यासारखे बिस्कीट खायला लावून तरुणाला बेदम मारहाण, LIVE VIDEO

फोनवर बोलताना भाई न म्हणता एकेरी नावाने बोलल्यामुळे 4 जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली

फोनवर बोलताना भाई न म्हणता एकेरी नावाने बोलल्यामुळे 4 जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली

फोनवर बोलताना भाई न म्हणता एकेरी नावाने बोलल्यामुळे 4 जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली

पिंपरी चिंचवड, 27 जानेवारी : पिंपरी चिंचवडमध्ये (pimpari chinchvad) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतच चालली आहे. गल्लीबोळातील भाईंची दादागिरी सुरूच आहे. फोनवर बोलताना भाई न म्हणता एकेरी नावाने बोलल्यामुळे 4 जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. एवढंच नाहीतर जमिनीवर बिस्कीट सुद्धा खायला लावली होती. हा सगळा प्रकार व्हिडीओ (viral video) कॅमेऱ्यात कैद केला असून व्हायरल झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील ताथवडे येथील स्वामी विवेकानंदनगरमधील सुखदा कॉलनीत ही घटना घडली आहे. प्रथमेश दवडे (वय २०) असं जखमी तरुणाचे नाव आहे.  आरोपी गंग्या उर्फ रोहन वाघमारे याने प्रथमेशला फोन करून शिवीगाळ केली आणि भेटण्यासाठी बोलावले होते. यावेळी रोहनसोबत त्याचे चार ते पाच साथीदार सोबत होते. मला फोनवर शिवीगाळ केली अशी विचारणा प्रथमेशने रोहनला केली. त्यामुळे संतापलेल्या रोहनने बेल्टने प्रथमेशला मारहाण सुरू केली. 'मी या एरियाचा भाई आहे. तू मला एकेरी नावाने कशाला बोलला, मला भाई का म्हणाला नाही' असं म्हणत शिवीगाळ केली आणि लाथाबुक्याने मारहाण केली. एवढंच नाहीतर जमिनीवर बिस्कीट टाकले आणि ते खाण्यास प्रथमेशला सांगितले. (मगरीला भरवताना घसरून तरुणाचाच पाय तिच्या जबड्याजवळ गेला आणि...; Shocking Video) पण, त्यानंतरही रोहन आणि त्याच्या इतर साथीदारांनी प्रथमेशला लाथाबुक्याने, बेल्ट आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आला होता. या गुंडांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर प्रथमेशने पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. या प्रकरणी आरोपी गंग्या उर्फ रोहन वाघमारे, प्रशांत आठवडे, आदित्य काटे आणि प्रेम शिंदे या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या