मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात मासळी बाजारात वाट चुकलं होतं 2 वर्षांचं लेकरू, अशी झाली आईची भेट

पुण्यात मासळी बाजारात वाट चुकलं होतं 2 वर्षांचं लेकरू, अशी झाली आईची भेट

 हल्लीची लहान मुलं खूप चंचल आहेत. त्यांना कितीही सांभाळलं तरी ते केव्हा काय करतील याचा काही नेम नसतो

हल्लीची लहान मुलं खूप चंचल आहेत. त्यांना कितीही सांभाळलं तरी ते केव्हा काय करतील याचा काही नेम नसतो

हल्लीची लहान मुलं खूप चंचल आहेत. त्यांना कितीही सांभाळलं तरी ते केव्हा काय करतील याचा काही नेम नसतो

पुणे, 21 डिसेंबर: हल्लीची लहान मुलं खूप चंचल आहेत. त्यांना कितीही सांभाळलं तरी ते केव्हा काय करतील याचा काही नेम नसतो. असाच प्रकार पुण्यात समोर आला. पुण्यातील नानापेठेतील (Pune Nana Peth) मासळी बाजारात (Fish Market)आई-वडिलांची नजर चुकवून वाट चुकलेला 2 वर्षांचा चिमुरडा पोलिसांना सापडला. बाळ काहीही एैकत नव्हतं सारखं रडत होतं. त्याला स्पष्ट बोलता देखील येत नव्हते. पोलिसांनी मोठी कसरत करून त्याच्या आईचा शोध घेऊन त्यांच्याकडे बाळ सुपूर्द केलं. हेही वाचा..उर्मिला मातोंडकर यांच्या 'या' प्रकरणाची मुंबई पोलिसांकडून दखल, FIR दाखल नेमकं काय आहे प्रकरण? काल (20 डिसेंबर) दुपारी 2 वाजेच्या सुमारास एका महिलेस एक 2 वर्षांच बाळ नाना पेठेतील मासळी बाजारात रडताना दिसलं. बाळ काहीतरी शोधत असल्याचं दिसून आल्यानं सदर महिलेनं ते बाळ घेऊन समर्थ पोलीस स्टेशन चौकीत आणलं. बाळ आईच्या विरहानं खूप रडत होतं. त्याला स्पष्ट बोलताही येत नव्हतं. यावेळी नानापेठ पोलीस चौकीला दिवसपाळी कर्तव्यावर असलेले अंमलदार विजय कदम यांनी सदर लहान बाळास शांत करुन त्यास बिस्किट देऊन शांत केलं. पोलीस हवालदार कदम यांनी लहान बाळाचे नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी त्याचा फोटो लागलीच पोलीस ठाणेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून माहिती दिली. तसेच सदर भागात पेट्रोलिंग साठी असलेले पोलीस शिपाई सुरज घनवट, पोलीस शिपाई नितीन दळवी यांना बोलावून घेवून सदर लहान बाळाचा मोबाईलमध्ये फोटो घेवून शोध घेण्यास सांगितले. पोलीस कर्मचाऱ्यांनी बाळाचे नातेवाईकांचा नानापेठ मासळी बाजार, नानापेठ भाजी मंडई, धान्य मार्केट अशोक चौक इत्यादी परीसरामध्ये शोध घेतला. परंतु ते सापडले नाहीत. पोलीस शिपाई सुरज घनवट यांना अलका थिएटर चौकाजवळ एक महिला रडताना दिसली. सुरज घनवट यांनी सदर महिलेकडे विचारपूस केली असता तिनं तिचे नाव शाहीन आयुबअली सय्यद (रा.अभिरुची मॉल शेजारी, वडगाव, धायरी, पुणे) असं सांगितलं. ती नानापेठेत तिच्या नातेवार्इंकाडे गेली असता तिचं 2 वर्षांचं बाळ मुलांसोबत खेळताना हरवल्याचं तिनं सांगितलं. बराचवेळ शोध घेवून देखील ते मिळत नसल्याचे ती रडत असल्याचं सांगितलं. सुरज घनवट यांनी सदर महिलेस नानापेठ पोलीस चौकीस घेवून गेले. चौकीत आपलं लहान बाळ पाहून तिचा जीव भांड्यात पडला. आईनं आवाज देताच बाळ धावतच त्यांच्या आईच्या कुशीत गेलं. नंतर संबंधित बाळ शाहीन आयुबअली सय्यद या महिलेकडे सुपूर्द करण्यात आलं. हेही वाचा...मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर? काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद चव्हाट्यावर! समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर अंकित नानापेठ पोलीस चौकीचे सिनिअर पीआय विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय कदम, पोलीस शिपाई सुरज घनवट व पोलीस शिपाई नितीन दळवी यांनी ही कामगिरी केली.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Maharashtra, Pune news, Pune police

पुढील बातम्या