Home /News /pune /

असे कसे जन्मदाते, 2 महिन्याच्या बाळाला दर्गाच्या पायरीवर सोडून पळाले!

असे कसे जन्मदाते, 2 महिन्याच्या बाळाला दर्गाच्या पायरीवर सोडून पळाले!

जन्मदात्या माता-पित्यानेच अवघ्या दोन महिन्यांच्या चिमुरडीला खराडीतील दर्ग्यात सोडून दिले होते.

पुणे, 23 फेब्रुवारी : पुण्यातील  (Pune) चंदननगर पोलीस स्टेशन (Chandannagar Police Station) हद्दीत मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. रात्रीच्या अंधारात 2 महिन्याच्या मुलीला तिच्या आई-वडिलांनी दर्गाजवळ सोडून दिल्याचा प्रकार घडला आहे. बाळाला सोडून देणाऱ्या माता-पित्यांचा शोध सुरू आहे. धक्कादायक म्हणजे, 10 दिवसातली ही दुसरी घटना आहे. जन्मदात्या माता-पित्यानेच अवघ्या दोन महिन्यांच्या चिमुरडीला खराडीतील दर्ग्यात सोडून दिले होते. मात्र, बाळाची माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटांमध्ये चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चिमुरडीला ताब्यात घेतले. त्यानंतर दामिनी पथकासह महिला पोलीस उपनिरीक्षकाने चिमुरडीला पोलीस ठाण्यात आणले. थंडीमुळे गारठून गेल्या चिमुरडीला पाहून उपस्थितीत कर्मचाऱ्यांच्या काळजाचे पाणी झाले. महिला कर्मचाऱ्यांनी या चिमुरडीला बाटलीतून दुध पाजून ममत्व जपले आहे. सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास खराडीतील एका दर्ग्यात दोन महिन्यांच्या चिमुरडीला तिच्या आई-वडिलांनी सोडून दिल्याची माहिती चंदननगर पोलीस ठाण्यातील एलआयबीचे कर्मचारी पांडुरंग नानेकर यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी ही माहिती दामिनी पथकाला दिली. त्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर दामिनी मार्शल उज्ज्वला बनकर आणि सुवर्णा वाळके यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेउन बाळाला ताब्यात घेतले. त्यांनी बाळाला पोलीस ठाण्यात आणून सुशृषा केली. त्यानंतर दुध पाजून दोन महिन्यांच्या चिमुरडीला आपलेसे केले. ही कामगिरी पांडुरंग नाणेकर, समीर शेख, संदीप पाटील यांच्या पथकाने केली. दरम्यान, बाळाला सोडून देणाऱ्या माता-पित्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संगीता काळे यांनी दिली आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Crime news, Maharashtra, Mumbai case, Pune, Small baby

पुढील बातम्या