Home /News /pune /

पुणे हादरलं, एकतर्फी प्रेमातून 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीचा कोयत्याने चिरला गळा, तिघे नराधम फरार

पुणे हादरलं, एकतर्फी प्रेमातून 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीचा कोयत्याने चिरला गळा, तिघे नराधम फरार

शहरात एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू मुलीचा खून झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पुणे, 12 ऑक्टोबर : पुण्यात (pune) एका कबड्डीपट्टू (kabaddi players) 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून (one-sided love affair) कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बिबेवाडीमध्ये  (pune bibwewadi )घडली आहे. तीन तरुणांनी या मुलीवर कोयत्याने हल्ला चढवला होता. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स इथं ही घटना घडली.  क्षितिजा अनंत व्यवहारे (shitija vyavahare) (वय 14, रा, अप्पर, बिबवेवाडी) असं मृत तरुणीचं नाव आहे. क्षितिजा नियमितपणे कब्बडीचा सराव करण्यासाठी संध्याकाळी इथं आली होती. त्याच वेळी तिथे आलेल्या तीन नराधम तरुणांनी क्षितिजावर कोयत्याने हल्ला चढवला. यावेळी इतर मुली कबड्डी खेळत होत्या. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. आरोपीने  क्षितिजा व्यवहारेचा कोयत्याने गळा चिरून हत्या केली. हत्येच्या वेळी त्याच्याकडे पिस्तुल सुद्धा होती, अशीही माहिती समोर आली. रागाच्या भरात त्याने कोयत्याने सपासप वार केले.  घटनेनंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. यातील एक आरोपही तिच्या नात्यातला होता, अशी माहितीसमोर आली. Sangli Job Alert: नूतन होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय सांगली इथे भरती शहरात एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू मुलीचा खून झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी क्षितिजाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनास्थळाचा पंचनामा केला.

'ठाण्यात लिंबू सरबतापेक्षा बिअर स्वस्त..',विजू माने-कुशल बद्रिकेला आला अजब अनुभव

आरोपी दोन कोयते, 2 तलवारी, 2 सुरे आणि एक खेळण्यातील पिस्तुल घेऊन आले होते. धक्कादायक म्हणजे, घटनास्थळावर पोलिसांची गस्तीवर असलेली गाडी गेली होती. त्यानंतर पोलिसांची गाडी गेल्यानंतर आरोपी पुन्हा 10 मिनिटात तिथे पोहोचले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी बिबेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून गुन्हे शाखेसह बिबवेवाडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Pune

पुढील बातम्या