पुणे, 02 जून : राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत असताना आता पुणेकरांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी भाजपचे 100 नगरसेवक 6 आमदार आता प्रत्येक वार्डात कोरोना विरोधात चौकीदार म्हणून रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यात एकीकडे रुग्ण वाढतायत तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याची संख्याही दिलासादायक आहे. पण अशात कोरोनाचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी आता भाजप मैदानात उतरली आहे.
कोरोनाचा प्रसार कमी व्हावा म्हणून मास्क, सॅनिटायजर वाटणं, अन्नधान्य देणं त्यासोबतच रुग्णांना रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर अशी मदत मिळवून देणं यावर भर असणार अशी माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर भाजपच्या काही नेत्यांची आणि नगरसेवकांची महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये या निर्णय घेण्यात आला आहे.
खासदार गिरीश बापट, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पालिकेत कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी नेमलेल्या विविध अधिकाऱ्यांची भेट घेतली. कोरोनाच्या विषयात राजकारण करणार नाही असं सांगत पालकमंत्री मविआ सरकारकडे मदतीचा हात भाजप पुढं करतय अशी ग्वाही त्यांनी दिली.
तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा मुंबईत करोनाने मृत्यू, तब्बल 10 तास नाही मिळाला बेड
लॉकडाऊनमध्ये संतांनी केलं बर्थडे सेलिब्रेशन, पार्टीत होते 9 कोरोना पॉझिटिव्ह
परंतु, आता लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या अनलॉक 1 आणि बिगीन अगेन नियमावली जाहीर झाली आहे. पुणे शहरातील कंटेनमेंट झोन्स आणि जिल्ह्यासाठी नवीन नियमावली आज जाहीर होणार आहे. केंद्राकडून मिळालेल्या सूचनेनंतर राज सरकारने राज्यातील वेगवेगळ्या भागात कसे निर्णय घेता येतील, याबद्दल नियमावली तयार केली आहे. ज्या त्या भागातील परिस्थितीत पाहून निर्णय घेतले जाणार आहे. याबद्दल जिल्हाधिकारी घोषणा करणार आहे.
कोरोनाने घरात बसवलं अन् वादळाने घराचं छप्परचं उडालं, डोळ्यांत पाणी आणणारी घटना
संपादन - रेणुका धायबर