Home /News /pune /

पोलीस अधिकाऱ्यांनीच केला 'चोरावर मोर'; तपासाच्या नावाखाली लुटले 75 कोटींचे बिटकॉईन

पोलीस अधिकाऱ्यांनीच केला 'चोरावर मोर'; तपासाच्या नावाखाली लुटले 75 कोटींचे बिटकॉईन

Crime in Pune: काही दिवसांपूर्वी बिटकॉईन फसवणूक प्रकरण देशभरात चांगलंच गाजलं होतं. या फसवणूक प्रकरणात तब्बल 240 जणांचा समावेश होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी 'चोरावर मोर' केला आहे. त्यांनी आरोपींकडील डेटाचा गैरवापर करत परस्पर बिटकॉईन काढून घेतले आहेत.

पुढे वाचा ...
    पुणे, 26 मार्च: काही दिवसांपूर्वी बिटकॉईन फसवणूक प्रकरण देशभरात चांगलंच गाजलं होतं. या फसवणूक प्रकरणात तब्बल 240 जणांचा समावेश होता. संबंधित आरोपींनी भरघोस कमाईचं आमिष दाखवून देशभरातील अनेकांची फसवणूक केली होती. फसवणुकीची व्याप्ती पाहता देशभर हे प्रकरण चांगलचं गाजलं होतं. पण या प्रकरणाचा तपास करणाऱ्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी 'चोरावर मोर' केला आहे. त्यांनी आरोपींकडील डेटाचा गैरवापर करत परस्पर बिटकॉईन काढून घेतले आहेत. त्यानंतर आरोपींनी आलिशान कार आणि फ्लॅट खरेदी केले आहेत. पंकज प्रकाश घोडे आणि रवींद्र प्रभाकर पाटील असं संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचं नाव आहे. बिटकॉईन फसवणूक प्रकरणात दोघांची सायबर तज्ज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पण त्यांनी 240 आरोपींकडील तब्बल 75 कोटी रुपयांचे बिटकॉईन लंपास केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडून आतापर्यंत 6 कोटी रुपयांचे बिटकॉईन आणि इतर चलन जप्त केलं आहे. आरोपी पाटील याने काही बिटकॉईन आपली पत्नी आणि भावाच्या खात्यावर देखील वळवल्याचं तांत्रिक तपासात उघड झालं आहे. संबंधित बिटकॉईन जप्त करण्यासाठी पोलिसांनी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पण त्यासाठी लागणारा गोपनीय क्रमांक आरोपी रवींद्र पाटील याच्या पत्नीलाच माहीत असल्याचं पाटील याच्याकडून सांगण्यात आलं आहे. पण आरोपी रवींद्र पाटील आणि त्याचा भाऊ यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. आरोपी पंकज घोडे याने देखील काही बिटकॉईन गैरमार्गाने आपल्या खात्यात वर्ग केले आहेत. पण तो पोलीस तपासाला सहकार्य करत नसल्याचं तपास अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. हेही वाचा- 300 रुपयांसाठी हत्या; उधार दिलेले पैसे दिले नाही म्हणून एकाचा खून, आरोपी गजाआड आरोपी रवींद्र पाटील याने आतापर्यंत 240 बिटकॉईन घेतल्याचं आढळून आलं आहे. या पैशातून आरोपीनं 6 कोटी रुपयांचे दोन फ्लॅट खरेदी केल्याचं पोलीस तपासात आढळलं आहे. तसेच आरोपीनं काही आलिशान गाड्यांची खरेदी केल्याचंही पोलिसांचं म्हणणं आहे. ही मालमत्ता देखील जप्त करण्यात येणार आहे. तपास अधिकाऱ्यांनीच आरोपींच्या खात्याने गैरमार्गाने बिटकॉईन लंपास केल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. हेही वाचा- हजारो कोटी लुबाडणारा कुख्यात भामटा पोलिसांच्या जाळ्यात, बनला होता कांदा व्यापारी आरोपी रवींद्र पाटील हा माजी आयपीएस अधिकारी असून तो केपीएमजी कंपनीत नोकरी करत होता. ही कंपनी पोलीस तपासात किंवा इतर कामांत सायबर तज्ज्ञ पुरवणारी कंपनी आहे. माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील हा देखील याच कंपनीत काम करत होता. याच कंपनीच्या वतीने पाटील याची सायबर तज्ज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Cyber crime, Pune

    पुढील बातम्या