Home /News /pune /

Pune News: पुणे महापालिकेने दिली मोठी खूशखबर! कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर फायदा

Pune News: पुणे महापालिकेने दिली मोठी खूशखबर! कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर फायदा

पुणे महापालिकेच्या (PMC)अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला खूश करून टाकणारी घोषणा घोषणा गुरुवारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

    मुंबई, 16 सप्टेंबर : पुणे, 16 सप्टेंबर : पुणे महापालिकेने (Pune News) आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी गुरुवारी दिली. PMC अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग (7th pay commission to PMC) लागू करण्यात येत असल्याची घोषणा गुरुवारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्यासंदर्भात एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे यांनी पुणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला. या बैठकीस विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, मनपातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. KBC : 'कधीच विसरू शकत नाही पहिलं प्रेम'; पुण्याच्या दीप्तीसमोर BIG B झाले व्यक्त राज्यातील महापालिकांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती विहीत करण्याबाबत नगरविकास विभागाने 2 ऑगस्ट 2019 रोजी शासन निर्णय जारी केला होता. त्यानुसार पुणे महानगरपालिकेच्या महासभेने अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा ठराव 10 मार्च 2021 रोजी केला होता. सदरचा ठराव महापालिका प्रशासनाने मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला होता. त्याची दखल घेत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी या बैठकीचे आयोजन केले होते. श्रमिकांच्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात डॉ. नीलम गोऱ्हे, तसेच शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत पाठपुरावा करत होते.
    First published:

    Tags: Pune, Pune news

    पुढील बातम्या