Home /News /pune /

पुणे ग्रामीण भागात Omicron चा शिरकाव, जुन्नरमध्ये आढळले 7 रुग्ण

पुणे ग्रामीण भागात Omicron चा शिरकाव, जुन्नरमध्ये आढळले 7 रुग्ण

 पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ओमायक्रॉनचे 7 नवीन रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ओमायक्रॉनचे 7 नवीन रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ओमायक्रॉनचे 7 नवीन रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे

पुणे, 17 डिसेंबर : कोरोनाचा (Corona Virus)  नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या (Omicron) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. पुण्यातील शहरी भागात ओमायक्रॉनने एंट्री केली आहे. त्यापाठोपाठ आता ग्रामीण भागात सुद्धा ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. जुन्नरमध्ये ओमायक्रॉनचे 7 रुग्ण आढळून आले आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी व  नारायणगाव येथील एकूण ७ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे उघड झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. येथील 16 रहिवासी दुबई येथे पर्यटनासाठी गेले होते. तेथून ते परत आल्यानंतर सर्व लोकांचे rt-pcr नमुने घेण्यात आले. सदर नमुने १२ डिसेंबरला  पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले होते. सर्व रुग्णांना ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथे दाखल करण्यात आले आहे. यासोबत त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचे RT-PCR नमुने प्राथमिक आरोग्य केंद्र वारुळवाडी येथे घेण्यात आलेले आहे व पुढील तपासणीसाठी पुणे येथे पाठविले आहे अशी माहिती वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली आहे. या रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. जिनोम सिक्वेसिंग चाचणीत त्यांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात 32 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. महाराष्ट्र हे ओमायक्रॉनचे हॉट स्पॉट बनत असल्याचं या आकडेवारीवरून दिसून येत आहे. दरम्यान आरोग्य विभागाने जानेवारीमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली असून, त्यानंतर जानेवारीमध्ये महाराष्ट्रात ओमायक्रॉनची नवी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाबत निर्बंध वाढवण्यात आले आहेत. देशभरात रुग्णांची संख्या 97 वर आता देशात Omicron व्हेरिएंटची 97 प्रकरणे समोर आली आहेत. तर दिल्लीत हा आकडा 20 वर पोहोचला आहे. आदल्या दिवशी कोरोनाचे 85 नवीन रुग्ण आढळून आले होते. यामध्ये सुमारे 40 लोकांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. यामध्ये ओमायक्रॉनची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. गुरुवारी सापडलेल्या बाधितांनी गेल्या चार महिन्यांचा विक्रम मोडला आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर लोकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या