मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

दौंड 7 जणांच्या हत्याकांड प्रकरणाला धक्कादायक वळण, मारेकरी अखेर सापडला

दौंड 7 जणांच्या हत्याकांड प्रकरणाला धक्कादायक वळण, मारेकरी अखेर सापडला

 अवघ्या महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या दौंडमधील हत्याकांड प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

अवघ्या महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या दौंडमधील हत्याकांड प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

अवघ्या महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या दौंडमधील हत्याकांड प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  sachin Salve

सुमित सोनवणे, प्रतिनिधी

दौंड, 25 जानेवारी : अवघ्या महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या दौंडमधील हत्याकांड प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. दौंड तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात सहा दिवसात 7 मृतदेह सापडले असुन यामध्ये तीन लहान मुलांचा देखील समावेश आहे. हे 7 ही खून चुलत भावाने केले असल्याचे तपासातून समोर आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावात राहणाऱ्या पवार आणि फुलावरे कुटुंबातील महिला आणि पुरुषांचे टप्प्याटप्प्याने सहा दिवसात 7 मृतदेह दौंड तालुक्यातील पारगाव मधील भीमा नदी पात्रात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. नेमका यांचा घातपात झाला की, आत्महत्या केली याबद्दल पोलिसांकडून तपास सुरू होता. अखेरीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

(आधी दोन मुलांना ढकललं नंतर स्वतः घेतली गोदावरीत उडी; 27 वर्षीय आईचं धक्कादायक पाऊल)

मोहन पवार यांच्या चुलत भावानेच हे खून केल्याचे समोर आले आहे. मोहन पवार यांच्या मुलासोबत चुलत भावाचा मुलगा गेला होता. त्यावेळी त्यांचा अपघात झाला होता. त्यांच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण ही बाब मोहन पवार यांनी त्याला सांगितल नाही. 4 दिवसांनी मुलाच्या अपघाताची बातमी मारेकरी चुलत भावाला मिळाली. त्यानंतर मुलाचा मृत्यू झाला. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा राग मनात धरून मोहन पवार यांच्यासह कुटुंबीयांची हत्या केली आणि मृतदेह भीमा नदीच्या पात्रात फेकून दिली. मोहन उत्तम पवार ( वय ४८ ), संगिता मोहन पवार (वय ४५), राणी शाम फुलवरे (वय २५), शाम फुलवरे ( वय २८) आणि रितेश फुलवरे (७) कृष्णा फुलवरे (४) छोटू फुलवरे (३) अशी मृतांची नाव आहे.

(आफताब पूनावालाने का केली श्रद्धाची हत्या, पोलिसांकडून आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा)

तर, अशोक कल्याण पवार (वय 40), श्याम कल्याण पवार (वय 30 ), प्रकाश कल्याण पवार (वय 32) आणि आणखी एक त्यांचा भाऊ अशा चौघांना ताब्यात घेतले आहे. मृतक मोहन पवार यांचे आरोपी हे सख्खे चुलत भाऊ आहेत.

दरम्यान, सासरे मोहन उत्तम पवार आणि संगीता मोहन पवार हे दोघे पति पत्नी असून राणी शाम फुलवरे आणि शाम फुलवरे हे पवार यांची मुलगी आणि जावई असून त्यांना तीन मुले असा एकत्र परिवार अहमदनगर जिल्ह्यातील निघोज गावात राहत होते. अचानक भीमा नदी पात्रात त्यांच्या लहान मुलांसहित मृतदेह मिळून आले त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. यामध्ये मोहन पवार यांच्या दुसऱ्या मुलाचे एका विवाहित महिले सोबत प्रेम संबंध होते. त्यारागापोटीच घातपात केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. सध्या मोहन पवार यांचा मुलगा देखील बेपत्ता आहे त्याचाही शोध घेतला जात आहे.

First published:

Tags: पुणे