Home /News /pune /

डेटिंग अ‍ॅपवरचा डॉक्टर निघाला भामटा, पुण्यातील उच्चशिक्षित महिलेला घातला लाखोंचा गंडा

डेटिंग अ‍ॅपवरचा डॉक्टर निघाला भामटा, पुण्यातील उच्चशिक्षित महिलेला घातला लाखोंचा गंडा

Crime in Pune: पुणे शहरातील वडगाव शेरी परिसरात राहणाऱ्या एका उच्च शिक्षित महिलेसोबत एक विचित्र प्रकार घडला आहे. डेटिंग अ‍ॅपवर ओळख झालेल्या एका तरुणाने संबंधित महिलेला लाखोंचा गंडा (Money fraud with well educated woman) घातला आहे.

पुढे वाचा ...
    पुणे, 12 जानेवारी: पुणे (Pune) शहरातील वडगाव शेरी परिसरात राहणाऱ्या एका उच्च शिक्षित महिलेसोबत एक विचित्र प्रकार घडला आहे. डेटिंग अ‍ॅपवर ओळख झालेल्या एका तरुणाने संबंधित महिलेस तब्बल सात लाखांना गंडा (Money fraud with well educated woman) घातला आहे. आरोपी व्यक्तीने आपण डॉक्टर असल्याचं सांगून पीडितेला लग्नाचं आमिष दाखवलं होतं. त्यानंतर आपण लग्न करण्यासाठी दिल्लीत आलो असून सीमाशुल्क विभागाकडून परदेशी चलन सोडवण्याचं कारण देत महिलेकडून 7 लाख उकळले आहेत. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अजय नाथन नावाच्या व्यक्तीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ही घटना जून ते ऑगस्ट 2021 दरम्यान घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही उच्चशिक्षित असून त्या वडगाव शेरी परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी डेटिंग अ‍ॅपवर त्यांची ओळख अजय नाथन नावाच्या व्यक्तीशी झाली होती. आरोपी अजय याने आपण डॉक्टर असून जर्मनीत स्थायिक असल्याची बतावणी केली होती. हेही वाचा-25 वर्षीय नर्सवर डॉक्टरकडून बलात्कार; मित्रांनीही साधली संधी, औरंगाबादमधील घटना दरम्यान चॅटींग करत असताना आरोपीनं पीडित महिलेला लग्नाचं आमिष दाखवलं होतं. त्यानंतर तो लग्न करण्यासाठी दोन लाख अमेरीकन डॉलर घेऊन दिल्लीत आला असल्याचे त्यानं पीडित महिलेस सांगितलं. तसेच माझ्याकडे विदेशी चलन असल्याने सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अडवलं असल्याची बतावणी आरोपीनं केली. तसेच संबंधित चेक क्‍लिअर करण्यासाठी पैशांची गरज असल्याचं त्यानं महिलेला सांगितले. हेही वाचा-समाजकार्यासाठी बोलावून विवाहितेला अडकवलं जाळ्यात; 10महिने सुरू होता भयंकर प्रकार त्यानुसार, पीडित महिलेनं आरोपीला काही पैसे पाठवले. यानंतर आरोपीनं विविध प्रकारची कारणं देत पीडित महिलेकडून 7 लाख 8 हजार रुपयांची रक्कम उकळली आहे. आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित महिलेनं येरवडा पोलीस ठाण्यात आरोपी अजय नाथन याच्यासह अन्य पाच जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Money fraud, Pune

    पुढील बातम्या