मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Pune : 14 डिसेंबरपासून रंगणार 'सवाईचे सूर', वाचा यंदा काय आहे खास

Pune : 14 डिसेंबरपासून रंगणार 'सवाईचे सूर', वाचा यंदा काय आहे खास

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

पुण्यातील सांस्कृतिक महोत्सवाचा शिरोमणी म्हणून नावलौकिक असलेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव येत्या 14 ते 18 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 06 डिसेंबर : पुण्यातील सांस्कृतिक महोत्सवाचा शिरोमणी म्हणून नावलौकिक असलेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव येत्या 14 ते 18 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. दरम्यान सवाई गंधर्व भीमसेन महोत्स मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल या ठिकाणी होणार असून याच दरम्यान शिवाजीनगर येथील राहुल थिएटर शेजारी असणा-या सवाई गंधर्व स्मारक या ठिकाणी दि. 14, 15 व 16 डिसेंबर दरम्यान सकाळी 11 ते 1 या वेळेत षड्ज व अंतरंग हे कार्यक्रम पार पडतील. शिवाय महोत्सवादरम्यान दरवर्षी आयोजित करण्यात येणारे ‘शताब्दी स्मरण’ हे चित्रप्रदर्शन देखील या वेळी वैशिष्ट्यपूर्ण असेल, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली.

पं. जसराज यांची मुलगी दुर्गा जसराज आणि त्यांचे भाचे व शिष्य पं. रतन मोहन शर्मा हे पं. जसराजांच्या आठवणींना 14 डिसेंबर रोजी उजाळा देतील. पं. भीमसेन जोशी यांच्या सांगीतिक जीवनावर आधारित चित्रपटाचे प्रदर्शन 15 डिसेंबर रोजी करण्यात येईल. या चित्रपटाची निर्मिती आर्य संगीत प्रसारक मंडळाने केली आहे. तर 16 डिसेंबर रोजी सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ यांचे सुपुत्र आलम खाँ यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम होईल.

Pune : रस्त्यावर भिकारी दिसला तर करा 'इथं' संपर्क, त्याचं तातडीनं होईल पुनर्वसन

महोत्सवात असणा-या चित्र प्रदर्शनाविषयी माहिती देताना प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर म्हणाले की, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने संपन्न होणाऱ्या या वर्षीच्या महोत्सवात दर वर्षीप्रमाणे प्रकाशचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यावर्षी हे प्रदर्शन पं. भीमसेन जोशी यांच्या प्रकाशचित्रांवर आधारित असेल. प्रकाशचित्रात टिपला गेलेला प्रत्येक क्षण आपल्याला पुन्हा तो क्षण जगण्याचा आनंद देतो. प्रकाशचित्राचे हे सामर्थ्य या प्रदर्शनातून पुन्हा एकदा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

दिवंगत ज्येष्ठ प्रकाशचित्रकार अनिल देशपांडे व सुधाकर जोशी तसेच सतीश पाकणीकर यांच्या संग्रहातील अनेक प्रकाशचित्रातून आपल्याला यावर्षी देखील काळाच्या पडद्याआड गेलेली मैफल परत एकदा अनुभवायला मिळणार आहे. महोत्सवाचे मुख्य आयोजक पं. भीमसेनजी व आपली कला सादर करायला येणारे भारतभरातील कलाकार यांच्यातील स्नेहाचे, एकमेकांच्या कलांना दाद देतानाचे, सत्काराचे, आदराचे, प्रेमाचे संबंध किती अकृत्रिम आणि अत्यंत साधेपणाचे होते हे या प्रदर्शनात पाहता येईल. पं. भीमसेनजी व अन्य कलाकार यांच्या प्रकाशचित्रांबरोबरच पाकणीकरांच्या कॅमेऱ्याने टिपलेल्या ‘भीमसेनी मुद्रा’ ही या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असेल. गेली तेरा वर्षे वेगवेगळ्या थीमवर पाकणीकर यांनी महोत्सवात प्रदर्शने सादर केली आहेत, प्रदर्शनाचे हे चौदावे वर्ष आहे अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.

Pune : महापालिकेकडून मांजरींच्या नसबंदीचा धडाका, 2 महिन्यांची आकडेवारी उघड, Video

यावर्षी महोत्सवाची तिकीटविक्री ही टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठ येथेही होणार असून रसिकांना या ठिकाणी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तिकिटे उपलब्ध होऊ शकतील, याची कृपया नोंद घ्यावी.

महोत्सवासाठी पीएमपीएमएलची सेवा उपलब्ध असतील ते मार्ग खालीलप्रमाणे

मुकुंदनगर ते कार्यक्रमानंतर भक्ती शक्ती चौक, निगडी

मुकुंदनगर ते कार्यक्रमानंतर सिंहगड रस्ता (मारुती मंदिर, धायरी)

मुकुंदनगर ते कार्यक्रमानंतर कोथरूड डेपो (पौड रस्ता)

मुकुंदनगर ते पुन्हा कार्यक्रमानंतर वारजे माळवाडी

याबरोबरच ओला आणि उबर या वाहतूक सेवा देणा-या कंपन्यांच्या अॅपवर ‘सवाई 2022’ असे डेस्टिनेश टाकल्यास पुण्यात कोणत्याही ठिकाणाहून महोत्सवाला येण्याचा मार्ग दिसू शकणार असून यामुळे प्रवाशांसाठी महोत्सवाच्या ठिकाणी पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. शिवाय रिक्षा संघटनांशी देखील आमचे बोलणे झाले असून त्यांनी महोत्सवासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे मान्य केले असल्याची माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली.

First published:

Tags: Local18, Pune