Home /News /pune /

आधी गुन्हे केले मग लिहिली कथा; आता बनवणार चित्रपट, पुण्यातील लेखकाचा कांड वाचून बसेल धक्का

आधी गुन्हे केले मग लिहिली कथा; आता बनवणार चित्रपट, पुण्यातील लेखकाचा कांड वाचून बसेल धक्का

Crime in Pune: गुन्हेगारी कथा वाचून किंवा गुन्हेगारी मालिका पाहून गुन्हे करायला प्रवृत्त झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. पण गुन्हे करून त्याचा उपयोग कथा लेखनासाठी केल्याचा एक धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.

पुढे वाचा ...
पुणे, 23 फेब्रुवारी: गुन्हेगारी कथा वाचून किंवा गुन्हेगारी मालिका पाहून गुन्हे करायला प्रवृत्त झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. पण गुन्हे करून त्याचा उपयोग कथा लेखनासाठी केल्याचा एक धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune) उघडकीस आला आहे. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून एका लेखकाला अटक (Accused writer arrested) केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी लेखकानं धक्कादायक कबुली दिली आहे. अनुप मनोरे (Anup Manore) असं या तथाकथित लेखकाचं नाव आहे. त्याने गेल्या दहा वर्षांपासून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. हाय प्रोफाइल महिलांशी नातं जोडून (Lure of sexual relationship with high profile woman) देतो. लैंगिक संबंधासोबत भरपूर पैसेही मिळतील, असं आमिष दाखवून आरोपीनं अनेकांची आर्थिक फसवणूक (Money fraud) केली आहे. अशाच प्रकारे आरोपीनं पुण्यातील एका 76 वर्षीय व्यवसायिकाला तब्बल साठ लाखांचा गंडा घातला होता. संबंधित व्यावसायिकानं पोलिसांत तक्रार केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात 28 वर्षीय महिलेला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. हेही वाचा-3 महिन्यांची चिमुकली जन्मदात्यांना झाली डोईजड; बेकायदेशीरपणे दिलं दत्तक त्यानंतर आता या गुन्ह्यांमागील मास्टरमाइंड कथित लेखकाला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे फसवणूक झालेल्या सर्वांवर अधारीत एक कथा बनेल असा धक्कादायक दावा  आरोपी लेखकानं पोलिसांकडे केला आहे. आरोपी लेखक अनुप मनोरे याची दोन अतिशय भिन्न रूपं पोलीस तपासात समोर आली आहेत. अगदी एखाद्या थरार कथेमध्ये शोभतील असे मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये लेखन करणारा हा लेखक आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील बड्या कलाकारांसोबत त्याची उठबस आहे. हेही वाचा-Kolhapur: लोखंडी रॉडचा एक घाव अन् खेळ खल्लास; लेकीनेच बापाला दिला भयंकर मृत्यू हिंदी रंगभूमीवर त्यानं शेक्सपियरच्या कॉमेडी ऑफ एरर्स या नाटकावर आधारित 'रंग रसिया बालम' या नाटकात काम केलं आहे. तो एक यशस्वी कलाकाराचं चकचकीत आयुष्य जगत होता. मात्र याच अनुप मनोरेचं दुसरं रूप तेवढंच विदारक आणि भयंकर आहे. कारण त्यानं गेल्या दहा वर्षांपासून हाय प्रोफाइल महिलांशी शरीर संबंध प्रस्थापित करून देतो, असं सांगत शेकडो लोकांना फसवलं आहे. यासाठी त्यानं गणेश शेलार हे बनावट नाव धारण केलं होतं. 'एंजॉय करा आणि हजारो रुपये कमवा', 'मीनाक्षी फ्रेंडशिप क्लब', 'रोड टू हेवन' अशा शीर्षकांसह तो वृत्तपत्रांमध्ये जाहिरात द्यायचा. यातूनच तो बडे मासे आपल्या गळाला लावत असे. त्यानंतर ब्लॅकमेल करत आर्थिक फसवणूक करायचा.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Crime news, Financial fraud, Pune

पुढील बातम्या