Home /News /pune /

पुण्यातील ओशो आश्रमात महिला संन्यासिनीचा विनयभंग, 81 वर्षीय साधकावर गुन्हा दाखल

पुण्यातील ओशो आश्रमात महिला संन्यासिनीचा विनयभंग, 81 वर्षीय साधकावर गुन्हा दाखल

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Pune: पुण्यातील ओशो आश्रमात (osho hermitage) एका 81 वर्षीय साधकाने 53 वर्षीय संन्यासिनीचा विनयभंग (female ascetics molestation) केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिला गेल्या 25 वर्षांपासून या आश्रमात ध्यानसाधनेसाठी येत होत्या.

पुढे वाचा ...
    पुणे, 19 फेब्रुवारी: पुण्यातील (Pune) ओशो आश्रम (Osho hermitage) हे देशभरातील प्रसिद्ध आश्रम आहे. देशातील विविध ठिकाणाहून अनेक संन्याशी याठिकाणी ध्यानसाधना करण्यासाठी येत असतात. असं असताना आश्रमातील एका 81 वर्षीय साधकाने 53 वर्षीय संन्यासिनीचा विनयभंग (female ascetics molestation) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून घटनेचा तपास केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 53 वर्षीय पीडित महिला पुणे शहरातील बाणेर परिसरातील रहिवासी आहे. गेल्या पंचवीश वर्षाहून अधिक काळापासून ही महिला ओशोच्या आश्रमात नियममितपणे ध्यानसाधना करण्यासाठी येत आहे. 1996 पासून त्या ओशो आश्रमाशी जोडलेल्या आहेत. घटनेच्या दिवशी 12 फेब्रुवारी रोजी त्या नेहमीप्रमाणे आश्रमात ध्यानसाधना करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी येथील एका 81 वर्षीय साधकाने त्यांचा विनयभंग केला आहे. हेही वाचा-अल्पवयीन मुलीसोबत किळसवाणं कृत्य; नराधमाने दुचाकीने घरी सोडण्याचा बहाणा केला अन् मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी सत्संग कार्यक्रमासाठी जात होत्या. यावेळी आरोपी साधक योग प्रताप यांनी फिर्यादीला हातवारे करत आपल्याजवळ बोलावून घेतलं. यानंतर आरोपीनं फिर्यादीला त्यांच्या गळ्यातील ओशो यांचा फोटो असलेली संन्याशी माळ काढून टाकण्यास सांगितली. त्यानंतर 'गेट आऊट' असं मोठ्याने ओरडत त्यांचा विनयभंग केला आहे. हेही वाचा-Googleवर कॉल गर्ल सर्च केलं अन् अडकला जाळ्यात, पुढे जे घडलं ते वाचून बसेल धक्का ही घटना घडल्यानंतर पीडित महिलेनं कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. 81 वर्षीय आरोपी योग प्रताप उर्फ लाल प्रताप हा ओशो आश्रमाच्या विश्वस्तांपैकी एक आहे. कोरेगाव पार्क पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक इंगोले तपास करीत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune

    पुढील बातम्या