मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune Breaking: ही प्रसिद्ध कंपनी झाली कोरोनाचा Hotspot, 3 दिवस बंद ठेवण्याचे आदेश

Pune Breaking: ही प्रसिद्ध कंपनी झाली कोरोनाचा Hotspot, 3 दिवस बंद ठेवण्याचे आदेश

Pune company corona Hotpsot: दोन महिन्यांच्या कालावधीत 240 जणांना कोरोनाची लागण झाली होती. तर 3 जणांचा मृत्यू झाला होता. आता 50 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत.

Pune company corona Hotpsot: दोन महिन्यांच्या कालावधीत 240 जणांना कोरोनाची लागण झाली होती. तर 3 जणांचा मृत्यू झाला होता. आता 50 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत.

Pune company corona Hotpsot: दोन महिन्यांच्या कालावधीत 240 जणांना कोरोनाची लागण झाली होती. तर 3 जणांचा मृत्यू झाला होता. आता 50 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत.

पुणे, 20 मे : पुण्यातील कोरोनाचे (Pune Corona) आकडे गेल्या काही दिवसांत दिलासा देणारे असल्याचं समोर येत आहे. मात्र गुरुवारी कमिन्स कंपनीत (Cummins Company) कोरोनाचा (coronavirus) शिरकाव झाल्याच्या बातमीनं पुन्हा एकदा चिंता वाढवल्या आहेत. कंपनीतील 50 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण (50 workers corona positive in cummins ) झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं कंपनी आता पुढचे तीन दिवस बंद ठेवण्याचा आदेश (3 days shut down in company) पुणे महानगर पालिकेच्या वतीनं देण्यात आला आहे.

(वाचा-Black Fungus: 'या' 10 राज्यांमध्ये काळ्या बुरशीचं थैमान, समोर आले धक्कादायक आकडे)

पुणे महानगरपालिका प्रशासनानं शहरातील कोरोनाच्या होत असलेल्या प्रसारावर नियंत्रण आणण्यात यश मिळवलं आहे. मात्र काही कंपन्या सुरू असल्यानं त्याठिकाणी कोरोनाचा धोका कायम असल्याचं पाहायला मिळतं. अशीच एक धोक्याची घंटा नुकतीच वाजली आहे. पुण्याच्या पुण्यातील डहाणूकर कॉलनीत असलेल्या कमिन्स कंपनीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. याठिकाणी तब्बल 50 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं कंपनीत मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग पसल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

कंपनीतील कोरोनाच्या रुग्णांची नेमकी आकडेवारी समोर येण्यासाठी कंपनीतील सगळ्या कर्मचाऱ्यांची कोरोनाची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वांची चाचणी करून 22 तारखेपर्यंत त्यांना अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र तोपर्यंत कोरोनाचा संसर्ग आणखी पसरू नये यासाठी तीन दिवस कंपनी बंद ठेवण्याचा आदेश महानगरपालिकेतर्फे देण्यात आला आहे. तसंच कमिन्स कंपनीला कोरोना हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आलं आहे.

(वाचा-Mumbai : अरुण गवळीच्या दगडी चाळीच्या जागी उभारणार 40 मजली टॉवर)

यापूर्वीही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यापूर्वी दोन महिन्यांच्या कालावधीत 240 जणांना कोरोनाची लागण झाली होती. तर 3 जणांचा मृत्यू झाला होता. कंपनीतील कर्मचाऱ्यांचं लसीकरण लवकरात लवकर करून घेण्याचे आदेश आता महापालिकेनं दिले आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या प्रकरणी आदेश काढले आहेत.

पुण्यात सध्या कोरोनाची आकडेवारी कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारीही कोरोना रुग्णांचा आकडा घटलेला पाहायला मिळाला. तर अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा 15 हजारांच्या जवळपास पोहोचला आहे. पण महापालिकेला आता कंपन्या आणि इतर ठिकाणाहून होणारा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. तरच या लढ्याला यश मिळू शकेल.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Pune, Worker