Home /News /pune /

Alert! राज्यात आणखी 5 दिवस पावसाचं सावट; पुढील 4 तासात पुण्यासह या जिल्ह्यांत बरसणार, गारपिटीचीही शक्यता

Alert! राज्यात आणखी 5 दिवस पावसाचं सावट; पुढील 4 तासात पुण्यासह या जिल्ह्यांत बरसणार, गारपिटीचीही शक्यता

Weather Forecast in Maharashtra: आणखी पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर पुढील पाच तासांत पुण्यासह या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे.

    पुणे, 07 मे: मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं (Non seasonal rain) हजेरी लावली आहे. तर बऱ्याच ठिकाणी गारपिटही (Hailstorm) झाली आहे. त्यामुळे राज्यात तापमानाचा पारा (Temperature in maharashtra) सरासरी तापमानापेक्षा खाली आला आहे. ऐन एप्रिल पूर्व मोसमी पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये. याचा फटका अनेक शेतकऱ्यांना अगोदरच बसला आहे. अशातच आणखी पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाची स्थिती (Rain alert) कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर, पुढील पाच दिवस संपूर्ण भारतात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस धडकणार असल्याची माहितीही भारतीय वेधशाळेनं दिली आहे. आज महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे. तर पुढील तीन ते चार तासांत पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासोबत वेगवान वाऱ्याच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यासाठी चार ते पाच अत्यंत महत्त्वाचे आहेत. याठिकाणी जोरदार पावसासोबत काही ठिकाणी गारपिटही होऊ शकते, असा मुंबई वेधशाळेनं वर्तवला आहेत. तसेच पाऊस सुरू असताना अथवा आकाशात विजा चमकत असताना, घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हे ही वाचा-Covid-19 in India: कोरोनाचं विक्राळ रूप; देशात दर तासाला 150 रुग्णांचा जातोय जीव मागील चार पाच दिवसांपासून पुणे शहरासह ग्रामीण भागाला अवकाळी पावसानं झोडपलं आहे. तर काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. त्यानंतर आज पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाचे ढग दाटले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात राहाणाऱ्या शेतकऱ्यांच्या चिंता वाढताना दिसत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Pune, Weather forecast, Weather warnings

    पुढील बातम्या