पुणे, 24 जानेवारी : पुणे जिल्ह्यातील पारगाव तालुक्यामध्ये मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पारगाव हद्दीमध्ये भीमा नदीच्या पात्रात आज आणखी एक मृतदेह सापडला असून 14 वर्षीय मुलाचा आहे. यामुळे आता मृतदेहांची संख्या 5 वर पोहोचली आहे. या घटनेचे गूढ आणखी वाढले आहे.
दौंड तालुक्यातून गेलेल्या भीमा नदी पात्रातील पारगाव हद्दीत मागील सहा दिवसांत आढळून आलेल्या चार मृतदेहांची ओळख पटलेली आहे. हे सर्व जण नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आहेत. हे चार ही जण एकाच कुटुंबातील आहेत. पारनेर तालुक्यातील निघोज येथील एकाच कुटुंबातील सदस्य आहे. त्यातच आज आणखी एक मृतदेह सापडला.
(शेकोटीवरून वाद पेटला, गाडी फोडली म्हणून संतापलेल्या तरुणाने केला गोळीबार, पुण्यातली घटना)
मोहन उत्तम पवार ( वय ४८ ), संगिता मोहन पवार (वय ४५), राणी शाम फुलवरे (वय २५), शाम फुलवरे ( वय २८) अशी सापडलेल्या मृतदेहाची नावे आहे. त्यांच्यासोबत चार वर्षाच्या आतील ३ लहान मुले आहेत. (सर्व रा. निघोज ता. पारनेर जि. नगर) हे माती वडार समाजातील भटकंती करणारे हे कुटुंब असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
(प्रजासत्ताक दिनापूर्वी 19 लाखांच्या बनावट नोटा जप्त, मुंबई उपनगरात मोठी कारवाई)
आज 14 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह कुणाचा आहे याबाबत पोलीस तपास करत आहेत. या सर्वांची हत्या झाली की घातपात याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाची अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: पुणे