मराठी बातम्या /बातम्या /पुणे /दौंडमध्ये ऑक्सिजन अभावी 4 रुणांचा मृत्यू, नातेवाईकांचा हॉस्पिटलवर आरोप

दौंडमध्ये ऑक्सिजन अभावी 4 रुणांचा मृत्यू, नातेवाईकांचा हॉस्पिटलवर आरोप

दौंड तालुक्यातील केडगाव येथील मोहन रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये (Mohan Hospital  Dound) मध्ये ही घटना घडली आहे.

दौंड तालुक्यातील केडगाव येथील मोहन रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये (Mohan Hospital Dound) मध्ये ही घटना घडली आहे.

दौंड तालुक्यातील केडगाव येथील मोहन रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये (Mohan Hospital Dound) मध्ये ही घटना घडली आहे.

सुमित सोनवणे,प्रतिनिधी

दौंड, 29 एप्रिल : नाशिक, बीडमध्ये  ऑक्सिजन अभावी (oxygen cylinder) रुग्णांच्या मृत्यूची घटना ताजी असताना आता पुणे (Pune) जिल्ह्यातील दौंडमध्ये (Dound) ऑक्सिजन अभावी 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णांच्या मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील केडगाव येथील मोहन रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये (Mohan Hospital  Dound) मध्ये ही घटना घडली आहे. रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 4 जणांचा मृत्यू झाल्याचा मृतांच्या नातेवाईकांनी आरोप केले आहे. मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी कोविड सेंटरमध्ये मोठा आक्रोश केल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांची कोरोनामुळे प्रकृती खालावली, मुंबईला हलवणार!

घटनेचे गांभीर्य ओळखून दौंडचे तहसीलदार संजय पाटील, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी रुग्णालयाला भेट देत नातेवाईकांना शांत राहण्याचे आवाहन केले.

IPL 2021 : ...तोपर्यंत आयपीएल संपणार नाही, BCCI ची परदेशी खेळाडूंना हमी

यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी केडगाव पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार करून रुग्णालयावर हलगर्जीपणा आणि ऑक्सिजन अभावीच मृत्यू झाल्याचे आरोप केले आहे. तसंच या हॉस्पिटलची सखोल चौकशी करण्याची तहसीलदारांकडे मागणी केली आहे.

First published: