Home /News /pune /

Pune: सर्पदंशामुळे किडन्या निकामी झालेली महिला पूर्णपणे ठणठणीत, दुर्मिळ सिंड्रोमवर केली मात

Pune: सर्पदंशामुळे किडन्या निकामी झालेली महिला पूर्णपणे ठणठणीत, दुर्मिळ सिंड्रोमवर केली मात

पुण्यातील नोबेल रुग्णालयात एक दुर्मिळ प्रकरण समोर आलं आहे. याठिकाणी सर्पदंशामुळे किडन्या निकामी झालेली महिला सहा आठवड्यांच्या उपचारानंतर पूर्णपणे बरी झाली आहे.

    पुणे, 17 जानेवारी: पुण्यातील (Pune) नोबेल रुग्णालयात (Nobel hospital) एक दुर्मिळ प्रकरण (Rare case of HUS) समोर आलं आहे. याठिकाणी काही दिवसांपूर्वी एका महिलेला दाखल करण्यात आलं होतं. संबंधित महिलेला सर्पदंश झाल्यामुळे त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या (kidney failure due to snake bite) होत्या. अशा अवस्थेत संबंधित 30 वर्षीय महिलेवर सहा आठवडे डायलिसिसचा उपचार केल्यानंतर त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत, अशी माहिती पुण्यातील नोबल हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. याबाबत अधिक माहिती देताना नोबेल रुग्णालयातील डॉ. अविनाश इग्नाटिअस यांनी सांगितलं की, 2 डिसेंबर रोजी एक 30 वर्षीय महिलेला नोबल हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आलं होतं. संबंधित महिलेचा लघवी मार्ग मोठ्या प्रमाणात संकुचित झाला होता. तसेच तिच्या प्रायव्हेट अंगाला सर्वत्र सूज आली होती. त्यांचे किडन्या निकामी झाल्याने त्या त्रस्त होत्या. त्यामुळे त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. हेही वाचा-धोका कायम..! Omicron नंतरही नवीन व्हेरिएंट येणार, तज्ज्ञांनी दिला सावध इशारा त्यांच्या रक्ताची तपासणी केली असता, लाल रक्तपेशी आणि प्लेटलेट्स कमी झाल्याचं चाचणीत निष्पन्न झालं. या चाचण्यांनंतर, संबंधित महिलेला हेमोलाइटिक यूरेमिक सिंड्रोम (HUS) नावाचा दुर्मिळ सिंड्रोम असल्याचं निदान झालं. हा विकार साप चावल्यामुळे होऊ शकतो. यानंतर एचयूएसची पुष्टी करण्यासाठी किडनी बायोप्सीची चाचणी देखील करण्यात आली. त्यातूनही त्यांना हेमोलाइटिक यूरेमिक सिंड्रोम असल्याचं समोर आलं. हेही वाचा-Omicron कोरोनाचा व्हेरिएंट नसून वेगळी महामारी? शास्त्रज्ञाचा मोठा दावा या दुर्मिळ आजारामुळे संबंधित महिलेला तातडीने डायलिसिसची गरज होती. HUSचं निदान झाल्यानंतर, प्लाझ्माफेरेसिसचा उपचार ताबडतोब सुरू करण्यात आला. कारण उपचार करण्यात जराही विलंब झाला असता, तर मूत्रपिंडाला कायमचं नुकसान होऊ शकलं असतं आणि ही स्थिती जीवघेणी देखील ठरू शकली असती. त्यामुळे प्लाझ्माफेरेसीस उपचारात दूषित प्लाझ्मा एका विशेष प्लाझ्मा-फिल्टरद्वारे काढून टाकला आणि त्यांना निरोगी प्लाझ्मा देण्यात आला. सहा आठवडे त्यांच्याव डायलिसिसचा उपचार करण्यात आला. हेही वाचा-12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत मोठी अपडेट, NTAGI प्रमुखाने दिले संकेत या सहा आठवड्याच्या काळात या महिला रुग्णाचा लघवीचा त्रास पूर्णपणे कमी झाला आहे. त्यामुळे त्यांचं डायलिसिस बंद करण्यात आलं. त्या आता ठीक असून त्यांच्या किडन्या पुन्हा कार्यशील झाल्या आहेत. त्यांना आता डायलिसिसची गरज भासणार नाही. हे अत्यंत दुर्मिळ प्रकरण आहे. इंडियन जर्नल ऑफ नेफ्रोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, जगभरात आतापर्यंत HUS आणि संपूर्ण मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांची संख्या 30 पेक्षा कमी आहे. अशा दुर्मिळ आजाराचं निदान झाल्यानंतरही डायलिसिसद्वारे संबंधित महिलेवर उपचार करण्यात आला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Pune

    पुढील बातम्या