मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यातील चिमुकलीच्या टॅलेंटची कमाल; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली दखल

पुण्यातील चिमुकलीच्या टॅलेंटची कमाल; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली दखल

PC- Saamana

PC- Saamana

पुण्यातील पाच वर्षीय माहिका पोतनीस (Mahika Potnis) हिने भन्नाट कामगिरी केली आहे. तिच्या या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं (India book of records) घेतली आहे.

  • Published by:  News18 Desk
पुणे, 24 जुलै: वीस दिवसांपूर्वी पुण्यातील एका चार वर्षीय चिमुकली ईशान्वी आढळराव पाटील हिने अवघ्या तीन मिनिटं दहा सेंकदात 195 देशांचे ध्वज (Flag) पाहून देशाचं नाव आणि राजधानी (Capital) सांगितली होती. ईशान्वीच्या या भन्नाट कामगिरीची दखल जगातील प्रमुख तीन रेकॉर्ड बुकनं घेतली होती. ही घटना ताजी असताना, पुणेकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील पाच वर्षीय माहिका पोतनीस (Mahika Potnis) हिने अवघ्या पाच मिनिटांत संस्कृतमधील 30 श्लोक म्हटले (30 Sanskrit verses recited in just 5 minutes) आहेत. तिच्या या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं (India book of records) घेतली आहे. खरंतर, संस्कृतमधील श्लोक लक्षात ठेवणं भल्याभल्या लोकांना शक्य होतं नाही. पण पुण्यातील रहिवासी असणाऱ्या माहिका पोतनीसनं कमाल करून दाखवली आहे. तिने अवघ्या पाच मिनिटांत 30 संस्कृतचे श्लोक म्हटले आहेत. तिच्या या कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली आहे. खरंतर, वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षीच माहिका भगवद्गीतेचे श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करायची. त्यामुळी मोहिकाची आई सारीका पोतनीस यांनीही तिच्या कौशल्याला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे ती अवघ्या पाचव्या वर्षीच संस्कृत भाषेतील श्लोक म्हणू शकते. हेही वाचा-रिक्षावर कोसळलं भलंमोठं झाड;अग्निशमन दलाच्या जवानामुळे वृद्ध चालकाचे वाचले प्राण याबाबत माहिती देताना माहिकाची आई सारिका पोतनीस यांनी सामनाला सांगितलं की, माहिका रोज सकाळी भगवद्गीतेचं श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करायची. त्यामुळे माहिकाची आवड आमच्या लक्षात आली. त्यामुळे आम्ही तिला संस्कृत श्लोकाचे पठण करण्यासाठी आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं. हेही वाचा- World Record: पुण्याच्या चिमुकलीची दुबईत भन्नाट कामगिरी; जागतिक विक्रम करत 3 रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवलं नाव दरम्यान माहिकाची आई सारिका पोतनीस यांनी माहिका श्लोकचं पठण करतानाचा व्हिडीओ इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला पाठवला होता. संबंधित संस्थेनं माहिकाची दखल घेतली आहे. इतक्या लहान वयात ती संस्कृत श्लोल न अडखळता म्हणते, म्हणून सर्व स्तरातून तिचं कौतुक केलं जात आहे.
First published:

Tags: Pune, Record

पुढील बातम्या