सेम टू सेम '3 इडियट्स'.. भररस्त्यावर गाडीत केली महिलेची डिलिव्हरी!

सेम टू सेम '3 इडियट्स'.. भररस्त्यावर गाडीत केली महिलेची डिलिव्हरी!

ऐश्वर्या जगताप आपल्या कुटुंबीयांसह मारुती ओम्नी गाडीतून दौंडला जात होत्या. वाटेतच तिला अचानक प्रस्तूती कळा सुरु झाल्या.

  • Share this:

सुमित सोनवणे,(प्रतिनिधी)

दौंड,20 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेता अमिर खानचा 3 इडियट्स चित्रपट तुम्ही पाहिला असेल. या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने सर्व इंजिनिआर तरूण ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एका गरोदर महिलेची प्रसूती करतात, अगदी तसाच काहीसा प्रकार दौंड तालुक्यातील वायरलेस फाटा येथे सोमवारी सकाळी एका महिलेसोबत घडला. ऐश्वर्या जगताप असे या 26 वर्षीय महिलेचे नाव आहे. ही महिला दौंड तालुक्यातील पाटस येथील रहिवासी आहेत.

तर झाले असे की, पाटस येथील ऐश्वर्या जगताप आपल्या कुटुंबीयांसह मारुती ओम्नी गाडीतून दौंडला जात होत्या. वाटेतच त्यांना अचानक प्रस्तूती कळा सुरु झाल्या. गिरीम येथील वायरलेस फाटा येईपर्यंत पोटातील बाळाचे डोके बाहेर येऊन ते बाळ अर्धवट अवस्थेतच आईच्या गर्भात अडकले. महिलेच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला होता. यावेळी ही महिला वेदनेने जीवाचा आकांत करत होती. तिच्यासोबत असलेले नातेवाईक खूप घाबरले. त्यांनी वायरलेस फाटा येथे असणारे लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. संदीप गावडे यांना बोलावून बाळाला व आईला वाचवण्याची विनंती केली.

या परिस्थितीमध्ये पेशंट तसेच दौंडपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला तर वाटेतच आई आणि बाळाच्या जीवास धोका निर्माण होईल. हे सगळ्यांना कळून चुकले होते. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखत डॉ. गावडे यांनी क्षणाचाही विलंब न करता रस्त्यावर असलेल्या एका गाडीतच डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. कोणतेही वैद्यकीय उपकरणे नसताना एका सिस्टरच्या मदतीने त्या महिलेची डिलिव्हरी करुन बाळ सुखरूप बाहेर काढले.

मात्र, बाळाच्या मानेभोवती नाळेचा वेढा असल्यामुळे व प्रवासात बाळ आईच्या पोटात अर्धवट अवस्थेत खूप वेळ अडकले होते. बाळाच्या नाकातोंडात शी गेली होती. त्यामुळे बाळ बाहेर आले पण ते बेशुद्धावस्थेत होते. अशा वेळी बाळ लगेच रडणे खूप आवश्यक असते, नाहीतर बाळाच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. पण अनेक उपाय करूनही बाळ रडत नव्हते. त्यामुळे डॉक्टरांची मोठी कसरत सुरू झाली होती. बाळ आणि बाळंतीनला वाचवण्याची धडपड डॉक्टर करत होते. शेवटी त्याला तोंडानेच कृत्रिम श्वासोच्छवास देऊन खूप वेळ कार्डियाक मसाज करण्यात आली. मोठी कसरत केल्यानंतर बाळाच्या रडण्याचा आवाज आला. आणि डॉक्टरांसोबतच, नातेवाईक व रस्त्यावर उपस्थित सर्वानीच सुटकेचा निश्वास सोडला.

बाळाला व्यवस्थित स्वच्छ करुन बाळ कापडात गुंडाळून बाळाला आईच्या हातात देण्यात आले. यावेळी डॉक्टर गावडे यांनी मातेच्या नातेवाईकांकडून कसलाही मोबदला न घेता आई व बाळ पुढील उपचारासाठी दौंड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले. यावेळी जाताना त्या मातेच्या व नातेवाईक यांच्या चेहऱ्यावरील हास्य व त्यांनी दिलेला आशीर्वादच डॉक्टरांसाठी खूप मोठा आनंद देऊन गेला होता त्याची किंमत दुसऱ्या कशाबरोबरच होवू शकत नाही, असे मत डॉ.संदीप गावडे यांनी व्यक्त करत अतिशय कठीण परिस्थितीत त्या बाळाचे व आईचे प्राण वाचवले.

First published: November 20, 2019, 5:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading