Home /News /pune /

Pune: माहेरहून परत येताच सासरी केला शेवट, लग्नानंतर 7 महिन्यातच विवाहितेचं टोकाचं पाऊल

Pune: माहेरहून परत येताच सासरी केला शेवट, लग्नानंतर 7 महिन्यातच विवाहितेचं टोकाचं पाऊल

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Suicide in Pune: पिंपरी परिसरातील वाकड याठिकाणी एका विवाहित महिलेनं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. लग्नानंतर अवघ्या सात महिन्यातच विवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं आहे.

    पुणे, 18 जानेवारी: पिंपरी (Pimpri) परिसरातील वाकड याठिकाणी एका विवाहित महिलेनं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (Married woman suicide) केली आहे. लग्नानंतर अवघ्या सात महिन्यातच संबंधित महिलेनं असं टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. संबंधित महिलेनं नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली? याचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. शीतल रोहीत पवार असं आत्महत्या करणाऱ्या 28 वर्षीय विवाहित महिलेचं  नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शीतल याचं जुलै 2021 मध्ये वाकड येथील रोहीत अशोक पवार यांच्याशी विवाह झाला होता. रोहीत हे आयटी पार्कमध्ये नोकरी करतात. अलीकडेच शीतल आपल्या माहेरी गेल्या होत्या. रविवारी त्या माहेराहून परत सासरी आल्या होत्या. सोमवारी घटनेच्या दिवशी पती नोकरीला गेल्यानंतर, पाठीमागे शीतल यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हेही वाचा-ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर रेप, 3 वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार दरम्यान, कामावर गेल्यानंतर पती रोहीत यांनी सकाळी दहाच्या सुमारास आपल्या पत्नीला फोन केला होता. त्यावेळी त्यांचं बोलणं झालं होतं. त्यानंतर बाराच्या सुमारास रोहित यांनी पुन्हा पत्नीला फोन केला. पण पत्नीने काहीही दिला नाही. त्यामुळे त्यांनी शेजारी राहणाऱ्या एका महिलेला फोन करून विचारणा केली. यावेळी महिलेनं घरी जाऊन दरवाजा ठोठावला. पण आतून काहीही प्रतिसाद नाही आला. त्यामुळे त्यांनी याची माहिती पती रोहित यांना दिली. हेही वाचा-मागाल ते देतो, काळजाच्या तुकड्याला सोडा, अपहरण झालेल्या लेकासाठी बापाची आर्त हाक यानंतर रोहित घरी आले. त्यांनी शीतल यांना दरवाजा उघडण्यास सांगितलं पण आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. त्यामुळे रोहीत यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी शीतल घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच पतीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून आत्महत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Suicide

    पुढील बातम्या