S M L

स्वाईन फ्लू पुणेकरांच्या जीवावर उठला, महिन्याभरात 25 जण दगावले

मार्च महिन्यात 25 जणांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झालाय. 21 जण अतिदक्षता विभागात लाईफ सपोर्टवर आहेत

Sachin Salve | Updated On: Mar 31, 2017 06:17 PM IST

स्वाईन फ्लू पुणेकरांच्या जीवावर उठला, महिन्याभरात 25 जण दगावले

हलीमा कुरेशी, पुणे

31 मार्च : पुण्यात यंदा मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात स्वाईन फ्लूचा उद्रेक पाहायला मिळाला. जानेवारीपासून आजपर्यंत 25 जणांचा स्वाईन फ्लूने बळी गेलाय. मार्च आणि नोव्हेंबर या महिन्यात साधारणपणे फ्ल्यूच्या केसेसचं प्रमाण जास्त असतं. मात्र, यावर्षी मार्चमधील केसेस तुलनेनं अधिक असल्याचं पालिका आरोग्य विभागानं म्हटलंय.

पुण्यातील वाढत्या स्वाईन फ्लूच्या केसेस या तापमानातील फरकाने असल्याचं पालिका आरोग्यप्रमुखांनी म्हटलंय. दिवसा तापमान अधिक आणि रात्री थंडी यामुळे विषाणूला पोषक वातावरण असल्याचं डॉक्टर सांगताहेत.पालिका आरोग्यविभागाकडून स्वाईन फ्लूची लक्षण आढळल्यास टॅमी फ्लू हे औषध दिलं जातंय. तसंच घशातील द्राव तपासणीसाठी पाठवला जात असल्याचं डॉक्टर फ्रान्सिस यांनी सांगितलं.

दर पाच वर्षांनी विषाणूंच्या जनुकीय संरचनेत बदल झाल्याने औषधांचा प्रभाव कमी होतो. मात्र सध्या तशी परिस्थिती नाही. याविषयी नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांनी देखील स्पष्ट केल्याचं पालिका आरोग्यप्रमुखांनी सांगितलं .

मार्च महिन्यात  25 जणांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झालाय. 21 जण अतिदक्षता विभागात लाईफ सपोर्टवर आहेत.

Loading...
Loading...

स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या

 वर्ष                 मृत्यू

मार्च  2013 -    10

मार्च 2014 -     00

मार्च 2015-     48

मार्च 2016 -    02

मार्च 2017-     25

त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, उलट्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 31, 2017 06:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close