पुणे, 08 जानेवारी : सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरातील प्रसिद्ध गणेश मंडळापैकी एक अशा शारदा गणपती मंदिरात (pune sharda ganpati mandir) चोरट्यांनी मध्यरात्री डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी 22 ते 25 तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
शहराच्या मध्यवस्तीत शारदा गणेश मंदिर आहे. प्रसिद्ध अश्या एक गणेश मंडळापैकी एक आहे. ऐन मध्यवस्तीत हे मंदिर आहे. दरम्यान मध्यवस्तीत सहसा मध्यरात्री देखील गर्दी असते. तर पोलिसांची गस्त देखील. पण या परिस्थितीत देखील चोरट्यांनी मध्यरात्री मंदिरात प्रवेश करून आतील दागिने आणि रोकड चोरून नेल्याचा प्रकार पहाटे समोर आला. त्यानंतर पोलिसांनी माहिती देण्यात आली.
पेट्रोल-डिझेल विकत घेताना वापरा SBI चे हे डेबिट कार्ड, मिळतील या ऑफर्स
माहिती मिळताच घटनास्थळी विश्रामबाग पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक चोर दागिने काढून घेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराचा शोध घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.