मराठी बातम्या /बातम्या /पुणे /25 दिवसाच्या बिबट्याची अखेर आईशी झाली भेट; पुण्यातील प्राणीमित्रांनी घडवला अनोखा संगम

25 दिवसाच्या बिबट्याची अखेर आईशी झाली भेट; पुण्यातील प्राणीमित्रांनी घडवला अनोखा संगम

Pune News: काही दिवसांपूर्वी पुण्यातील जुन्नर परिसरात एक 25 दिवसांचं बिबट्याचं पिल्लू सापडलं होतं. या अनाथ पिल्लाला त्याच्या आईशी भेट घालून देण्यात पुण्यातील प्राणीमित्रांना यश आलं आहे.

Pune News: काही दिवसांपूर्वी पुण्यातील जुन्नर परिसरात एक 25 दिवसांचं बिबट्याचं पिल्लू सापडलं होतं. या अनाथ पिल्लाला त्याच्या आईशी भेट घालून देण्यात पुण्यातील प्राणीमित्रांना यश आलं आहे.

Pune News: काही दिवसांपूर्वी पुण्यातील जुन्नर परिसरात एक 25 दिवसांचं बिबट्याचं पिल्लू सापडलं होतं. या अनाथ पिल्लाला त्याच्या आईशी भेट घालून देण्यात पुण्यातील प्राणीमित्रांना यश आलं आहे.

पुणे, 19 मे: काही दिवसांपूर्वी पुण्यातील जुन्नर परिसरातील वडगाव आनंद या गावात 25 दिवसांचं एक बिबट्याचं पिल्लू सापडलं होतं. स्थानिक शेतकरी शेतात काम करत असताना उसात गुरगुरल्याचा आवाज आला. संबंधित शेतकऱ्यानं जवळून पाहिल्यावर त्यांना समजलं की, याठिकाणी एक नवजात बिबट्याचं पिल्लू आहे. यानंतर त्यांनी या घटनेची माहिती वन्यजीव एसओएस टीम आणि वनविभागाला दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याच्या पिल्लाला रिस्क्यू केलं.

बिबट्याच्या पिल्ला रिस्क्यु केल्यानंतर, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि एसओएस टीमनं बिबट्याची तपासणी केली. त्याला कोणतं इन्फेक्शन झालं आहे का? त्याच्या शरीराचं डिहायड्रेशन झालं आहे का ? हेही तपासलं. 25 दिवसांच्या या बिबट्याच्या पिल्लाची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्याच्या पिल्लाची त्याच्या आईसोबत भेट घडवून आणली आहे. यावेळी एसओएस टीमनं या बिबट्याची आणि त्याच्या आईची भेट होतानाचा व्हिडीओही छुप्या कॅमेऱ्यानं शूट केला आहे.

वाईल्डलाइफ एसओएसचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक सत्यनारायण यांनी टाइम्स नाउ न्यूजला सांगितलं की, “बिबट्याचं पिल्लू दोन वर्षांचं होईपर्यंत त्यांच्या आईसोबतचं राहतं. दरम्यानच्या दोन वर्षात हे पिल्लू जंगलात जगण्याची आवश्यक असणारी कौशल्ये शिकतात. तसंच त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानाचा शोध घेतात. पण असं लहान पिल्लू आईपासून दुरावल्यानं त्याचा सहज मृत्यू होऊ शकतो. किंवा पूर्ण आयुष्य कैदेत राहावं लागू शकतं."

हे ही वाचा-VIDEO : 12 तास बिबट्याचा थरार, वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू

अशा स्थिती टाळण्यासाठी, आम्ही रेस्क्यू आणि रियूनियन ऑपरेशन्स शक्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. कारण पुनर्मिलन यशस्वी झालं, तर मानव आणि बिबट्या यांच्यात होणारा संघर्ष कमी होतो, अशी माहितीही वाईल्डलाइफ एसओएसचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक सत्यनारायण यांनी सांगितलं आहे.

First published:
top videos

    Tags: Pune news