पुणे, 18 सप्टेंबर : शौचालयाची टाकी ( toilet tank) साफ करत असताना टाकीत पडून एका 24 तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुणे (pune) जिल्ह्यातील शिरूर (shirur) तालुक्यातील कोरेगाव भीमा (koregaon bhima) परिसरात घडली आहे. या दुर्घटनेत 3 जण जखमी झाले आहे, त्यांची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा परिसरात राहणारे देवराम गव्हाणे यांच्या घरी ही घटना घडली आहे. गव्हाणे यांच्या घरातील शौचालयाची टाकी उपसण्याचे काम सुरू होते. त्यावेळी साफ करणारी एक व्यक्ती टाकीत पाईप टाकताना तोल जावून पडली. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. या व्यक्तीला वाचवण्यासाठी गेलेले दोघेही या टाकीत पडले.
अंगात भूत संचारलंय म्हणत पुजाऱ्याने केली महिलेला मंदिरात अमानुष मारहाण, VIDEO
त्यानंतर या घटनेची माहिती जवळच राहणाऱ्या शुभम आचार्य या 24 वर्षीय तरुणाला कळाली. त्यानेही मदतीसाठी धाव घेतली. टाकीत पडलेल्या तिघांना वाचवण्यासाठी शुभमने प्रयत्न केला पण त्यांना वाचवायला गेला आणि तोही यात तोल जाऊन पडला. चौघेही जण शौचालयाच्या टाकीत पडले. चौघांनाही गंभीर दुखापत झाली होती. स्थानिकांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
आईने आणलेली वेताची छडी तोडून फेकली; Amazon वर जाहिरात पाहून मुलांना सुटला घाम
शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने या चौघांना बाहेर काढले. परंतु उपचारापूर्वीच शुभम आचार्य यांचा मृत्यू झाला होता. तर उर्वरित तीन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर वाघोली येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
टाकीत पडून शुभमचा वयाच्या अवघ्या 24 वर्षी मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.