Home /News /pune /

Pune: गॅस कटरच्या सहाय्याने ATM फोडून पळवले 23 लाख, भल्या पहाटे मारला डल्ला, पाहा VIDEO

Pune: गॅस कटरच्या सहाय्याने ATM फोडून पळवले 23 लाख, भल्या पहाटे मारला डल्ला, पाहा VIDEO

Crime in Pune: पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवत याठिकाणी एका एटीएमवर दरोडा (ATM robbery) टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    पुणे, 17 जानेवारी: पुणे (Pune) जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील यवत याठिकाणी एका एटीएमवर दरोडा टाकल्याची (Robbery on atm) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडलं आहे. यावेळी चोरट्यांनी एटीएममधील तब्बल 23 लाख रुपयांची रक्कम चोरून (Theft 23 lakh) नेली आहे. दरोड्याची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील यवत गावातील महाराष्ट्र बँकेच्या ATM वर काही अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. हेही वाचा-सोन्याचे आमिष दाखवून शेतकऱ्याला संपवले, 48 तासात मारेकऱ्यांना पकडले आरोपींनी गॅस कटरच्या सहाय्यानं अलगदपणे एटीएम फोडलं आहे. यावेळी चोरट्यांनी ATM मधील तब्बल 23 लाख 81 हजार 700 रुपयांची रोकड पळवली आहे. रविवारी रात्री अडीच ते तीनच्या सुमारास हा गुन्हा घडला आहे. संबंधित सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची गुन्हे शाखा आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी एटीएम कॉन्ट्रॅक्टर विकास जालिंदर भगत यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Robbery

    पुढील बातम्या