कोरोनाने घेतला तरुण IAS अधिकाऱ्याचा बळी, सुधाकर शिंदे यांचा पुण्यात मृत्यू

कोरोनाने घेतला तरुण IAS अधिकाऱ्याचा बळी, सुधाकर शिंदे यांचा पुण्यात मृत्यू

शिंदे मुळचे परभणीचे होते. त्यांना पुण्यातल्या रुबी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याची प्रकृती ढासळत गेली. त्यातून ते सावरू शकले नाहीत.

  • Share this:

पुणे 09 ऑक्टोबर: त्रिपुरा कॅडरचे IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते 34 वर्षांचे होते. 2015 च्या बॅचचे ते अधिकारी होते. त्रिपुरात त्यांची नियुक्ती होती. सुट्टीत ते घरी आले असताना त्यांना कोरोनाने गाठलं.  शिंदे मुळचे परभणीचे होते.  त्यांना पुण्यातल्या रुबी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याची प्रकृती ढासळत गेली. त्यातून ते सावरू शकले नाहीत. शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी (9 ऑक्टोबर) 15 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर मृत्यूची संख्याह 40 हजारांच्या जवळ गेली आहे. राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या ही 15,06,018 एवढी झाली आहे. तर मृत्यूची संख्या ही ही 39,732 एवढी झाली आहे. राज्यात सध्या 2,36,491 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर 302 जणांचा मृत्यू झाला.

शुक्रवारी दिवसभरात 17 हजार 300 रुग्ण बरे झालेत. तर 12 हजार 134 नव्या रुग्णांचं निदान झालं. मुंबईतल्या रुग्णांचा आकडा वाढलेला आहे. दिवसभरात 2289 नवे रुग्ण आढळून आलेत.

कोरोनामुळे होणारे मृत्यु रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून टेलीआयसीयु प्रकल्प त्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्याच्या मदतीने कोरोनामुळे होणारा मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगत टेलिआयसीयूचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सकारात्मक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

राज्यात भिवंडी, औरंगाबाद, जालना, सोलापूर पाठोपाठ आज जळगाव आणि अकोला येथील रुग्णालयांमध्ये टेलिआयसीयुचा शुभारंभ आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. जळगाव आणि अकोला जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता आदी उपस्थित होते.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 9, 2020, 9:48 PM IST

ताज्या बातम्या